फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो कधी त्याच्या खेळामुळे तर कधी मैदानाबाहेरील कामांमुळे चर्चेत राहतो. यावेळी तो एका नव्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, रोनाल्डोने एक स्टंट करून ख्रिसमस साजरा केला आहे. हा स्टंट पाहून सगळेच थक्क झाले.
महान पोर्तुगीज फुटबॉलपटू आपल्या संपूर्ण कुटुंबासह लॅपलँड (फिनलँड) येथे ख्रिसमसच्या सुट्ट्या साजरा करण्यासाठी गेला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्फाळ पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये त्याच्या आजूबाजूला सर्वत बर्फ असल्याचे दिसत आहे. प्रचंड थंडी असूनही तो बर्फाळ पाण्यात शिरला. रोनाल्डोने संपूर्ण व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवरही अपलोड केला आहे.
यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये ३९ वर्षीय रोनाल्डो आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. यामध्ये त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये, तो असे म्हणताना ऐकू येतो की, माझ्यासाठी ही खूप खास वेळ आहे कारण ही अशी वेळ आहे जी सहसा आपल्याकडे नसते.
१० मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये रोनाल्डोने त्याच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली. लॅपलँडमध्ये तो सांताक्लॉजलाही भेटला, ज्याने रोनाल्डो आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला.
व्हिडिओच्या शेवटी फुटबॉलपटूने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशा व्यक्त केली की आगामी वर्ष त्याच्यासाठी व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या २०२४ सारखे उत्कृष्ट असेल.
संबंधित बातम्या