पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहॉम या दिग्गज खेळाडूचे सुवर्णपदक हुकले आहे. त्याला एका माजी क्रिकेटरच्या मुलाने हरवले आहे. २८ वर्षीय वॉरहोम याने ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत भाग घेतला होता.
विशेष म्हणजे, वॉरहॉम याने २०२१ मध्ये या स्पर्धेचा २९ वर्षांचा विश्वविक्रम मोडला होता. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्वत:चाच विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. त्यानंतर २०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले. पण कार्स्टन वॉरहॉम याला यावेळी मात्र, रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा रॉय बेंजामिन याने सुवर्णपदक पटकावले आहे. तो अमेरिकेच्या वतीने ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला.
४०० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत कार्स्टन वॉरहॉमचा पराभव हो सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१९ आणि २०२३ मध्ये, जेव्हा वॉरहोमने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले, तेव्हा रॉय बेंजामिनने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते.
टोकियो ऑलिम्पिकमध्येही बेंजामिन दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला फक्त रौप्यपदक जिंकण्यात यश आले.
कार्स्टन वॉरहोम आणि रॉय बेंजामिन हीट राऊंडमध्ये वेगवेगळ्या गटात होते. दोघेही शीर्षस्थानी पूर्ण पोहोचले, परंतु वॉरहोमने कमी वेळ घेतला. उपांत्य फेरीच्या शर्यतीतही असेच काहीसे घडले. मात्र अंतिम फेरीत बेंजामिनने ४६.४६ सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले.
वॉरहोमने ४७.०६ सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४५.९४ सेकंदात शर्यत जिंकून जागतिक आणि ऑलिम्पिक विक्रम केला. ब्राझीलच्या ॲलिसन डोस सँटोसने टोकियो आणि पॅरिस या दोन्ही ठिकाणी कांस्यपदक जिंकले.
रॉय बेंजामिनचे वडील विन्स्टन बेंजामिन हे १९८६ ते १९९५ दरम्यान वेस्ट इंडिज संघाचा भाग होते. वेगवान गोलंदाज विन्स्टन यांनी २१ कसोटी आणि ८५ एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांच्या नावावर १६१ विकेट आहेत.
रॉय बेंजामिन यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याने अँटिग्वा आणि बारबुडाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर हर्डल्ससोबतच रायने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ४x४०० मीटर रिलेमध्येही सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्याने या खेळात सुवर्णपदक जिंकले होते.