मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: ‘या’ क्रिकेटपटूनं हिंदूंना मुस्लिम बनवलं! सईद अन्वरचा गौप्यस्फोट, भारताशी खास कनेक्शन

VIDEO: ‘या’ क्रिकेटपटूनं हिंदूंना मुस्लिम बनवलं! सईद अन्वरचा गौप्यस्फोट, भारताशी खास कनेक्शन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 13, 2023 05:45 PM IST

saeed anwar on hashim amla viral video : सईद अन्वरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने दावा केला आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम आमला याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले आहे. अन्वरच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

saeed anwar
saeed anwar

saeed anwar on hashim amla viral video: पाकिस्तानच्या सईद अन्वरची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. भारताविरुद्ध वनडेत त्याने १९४ धावांची मोठी खेळी खेळली होती. मात्र, २००१ मध्ये त्याच्या आयुष्यात एक वाईट प्रसंग घडला. त्याच्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अन्वर पुर्णपणे बदलला आणि त्याने सर्वत्र फिरून इस्लामचा प्रचार सुरू केला.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, आता सईद अन्वरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने दावा केला आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम आमला याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले आहे. अन्वरच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी हादेखील दिसत आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओत काय आहे पाहा?

हाशिम आमलाचे कुटुंब मूळचे भारतीय

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला याचे कुटुंब मूळचे भारतातील असल्याची माहिती आहे. त्याचे कुटुंब १९२७ मध्ये सुरतहून दक्षिण आफ्रिकेत गेले. अमलाचा ​​जन्म डर्बनमध्ये झाला. ३९ वर्षीय अमलाने १२४ कसोटीत २८ शतके आणि ४१ अर्धशतकांच्या मदतीने ९२८२ धावा केल्या आहेत. तर १८१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ च्या सरासरीने ८११३ धावा केल्या आहेत. यात त्याने २७ शतके आणि ३९ अर्धशतके केली.

अमलाने ४४ आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात १२७७ धावा केल्या. यात त्याने ८ अर्धशतके ठोकली. तो २०१६ आणि २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग होता. यादरम्यान आमलाने १६ सामन्यात ४४ च्या सरासरीने ५७७ धावा केल्या. या दरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली.

WhatsApp channel