मराठी बातम्या  /  क्रीडा  /  महेंद्रसिंह धोनीची चित्रपटात एन्ट्री? थलपती विजयसोबत स्क्रिन शेअर करणार
dhoni
dhoni

महेंद्रसिंह धोनीची चित्रपटात एन्ट्री? थलपती विजयसोबत स्क्रिन शेअर करणार

22 June 2022, 19:04 ISTRohit Bibhishan Jetnavare

महेंद्रसिंह धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, तो आयपीएल खेळत आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. आता धोनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

महेंद्रसिंह धोनीने (ms dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकून दोन वर्षे झाली आहेत. पण आजही त्याची फॅन फॉलोइंग किंचितही कमी झालेली नाही. धोनी हा अतिशय साधेपणाने राहतो. तसेच, ग्लॅमरच्या दुनियेपासून कोसो दूर असतो. पण धोनी आता सिनेक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेंद्रसिंह धोनी आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर आपली नवी इनिंग सुरू करणार आहे. धोनी लवकरच सिने जगतात प्रवेश करु शकतो. धोनी साऊथच्या एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार थलपथी विजय हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच धोनीही या सिनेमात एक कॅमिओ करणार आहे.

या विषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण विजयच्या वाढदिवसा दिवशी या चित्रपटाची घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेता विजयची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. विजयने देखील धोनीच्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. सध्या धोनी (ms dhoni) त्याच्या प्रोडक्शनखाली चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईची आयपीएलच्या १५ व्या मोसमातील कामगिरी ही अतिशय निराशाजनक राहिली. CSK आयपीएल २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकले होते. त्यांचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानावर राहिला. त्याचबरोबर धोनी फलंदाजीतही फ्लॉप ठरला. त्याने १४ सामन्यात ३३.१४ च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान नाबाद ५० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.