मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah: बुमराहच्या 'या' शर्टची किंमत माहितीय का? एवढ्या पैशात खूप काही घेता येऊ शकतं

Jasprit Bumrah: बुमराहच्या 'या' शर्टची किंमत माहितीय का? एवढ्या पैशात खूप काही घेता येऊ शकतं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 04, 2022 06:43 PM IST

jasprit bumrah shirt price: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र, आता त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून तो पुन्हा चर्चेत आला आहे.

jasprit bumrah shirt
jasprit bumrah shirt

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चर्चेत आहे. आशिया चषक आणि T20 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला गोलंदाजी विभागात मोठा फटका बसला. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेला बुमराह सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. यावेळी बुमराह क्रिकेट, दुखापतीमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. हे कारण म्हणजे जसप्रीत बुमराहचा महागडा शर्ट. या शर्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

खरंतर बुमराहने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बुमराहने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या फोटोला पंजाबीमध्ये कॅप्शनही दिले आहे. मात्र, या कॅप्शनपेक्षाही जास्त चर्चा लोक हे त्याच्या शर्टच करत आहेत जसप्रीत बुमराहने परिधान केलेल्या शर्टच्या किमतीने सर्वांचेच होश उडवले आहेत. या शर्टची किंमत १, १२,७६८ रुपये इतकी आहे.

हा शर्ट Balenciaga नावाच्या ब्रँडचा आहे. या शर्टवर इंग्रजीमध्ये Balenciaga असे लिहिले आहे. शर्टवर लिहिलेल्या ब्रँडच्या नावावरून चाहत्यांना त्याच्या किंमतीची माहिती मिळाली. क्रिकेटपटूंना लक्झरी लाइफ जगायला आवडते, एवढा महागडा शर्ट घालणे बुमराहसाठी काही नवीन गोष्ट नाही. मात्र, या शर्टशिवाय चाहते त्याला त्याच्या दुखापतीवरूनही ट्रोल करत आहेत.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे यंदाचा आशिया कप खेळू शकला नाही. आशिया चषकानंतर बुमराहने पुनरागमन केले असले तरी विश्वचषकापूर्वी त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो पुन्हा संघाबाहेर गेला. विश्वचषकादरम्यान चाहत्यांनी त्याला आयपीएल खेळण्यावरून ट्रोल केले होते.

चाहत्यांच्या मते बुमराह फक्त आयपीएल दरम्यान फिट राहतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची वेळ येते तेव्हा तो जखमी होतो. विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला बुमराहची प्रचंड उणीव भासली. उपांत्य फेरीतील सामन्यात संघाला एकही बळी घेता आला नाही. या सामन्यानंतरच संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या