Cricket In Olympics : १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री, IOC च्या बैठकीत विराटच्या लोकप्रियतेची चर्चा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cricket In Olympics : १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री, IOC च्या बैठकीत विराटच्या लोकप्रियतेची चर्चा

Cricket In Olympics : १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री, IOC च्या बैठकीत विराटच्या लोकप्रियतेची चर्चा

Oct 16, 2023 05:50 PM IST

Cricket In Los Angeles Olympics 2028 : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे. याची आज मुंबईत अधिकृत घोषणा करण्यात आली.

Cricket In Olympics
Cricket In Olympics

Cricket In Olympics : लॉस एंजेलिस येथे होणार्‍या २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याची अधिकृत घोषणा आज सोमवारी (१६ ऑक्टोबर) मुंबईत करण्यात आली आहे. ऑलिम्पिक गेम्समध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. क्रिकेटशिवाय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि फ्लॅग फुटबॉल यांचाही ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश आहे.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्समध्ये ५ नव्या खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तवाच्या बाजूने ९९ पैकी ९७ सदस्यांनी मतदान केले तर केवळ दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले. यानंतर आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा इतर खेळांसोबत समावेश झाल्याची घोषणा केली.

१९०० सालानंतर प्रथमच ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन क्रिकेट संघ होते. त्यावेळी इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला होता.

जय शहा काय म्हणाले?

या घोषणेनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, 'ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने खेळासाठी नवे आयाम खुले होतील आणि नवीन जागतिक बाजारपेठेत नवीन संधी निर्माण होतील. याचा आपल्या खेळाच्या इको सिस्टीमवर सकारात्मक परिणाम होईल. पायाभूत सुविधांचा विकास आणि कुशल व्यावसायिकांसाठी संधी निर्माण होतील.

विराटच्या लोकप्रियतेचे उदाहरण

यावेळी इटलीचा ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज आणि लॉस एंजेलिस २०२८ चे स्पोर्ट्स डायरेक्टर निकोलो कॅम्प्रियानी यांनी विराट कोहलीच्या लोकप्रियतेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, 'जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय खेळाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, या खेळाचे जगभरात २.५ अब्जांहून अधिक चाहते आहेत.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्येच क्रिकेटा का? असा प्रश्न तुमच्यापैकी काहींना पडला असेल. अमेरिकेत क्रिकेट वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि या वर्षी मेजर लीग क्रिकेट खूप यशस्वी ठरले. तसेच, पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे.

याशिवाय तरुणांसाठी हा खेळ अधिक संबंधित ठेवण्यासाठी डिजिटल उपस्थिती आवश्यक आहे आणि इथे माझा मित्र विराट (कोहली) याचे सोशल मीडियावर ३४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया जगातील तो तिसरा सर्वाधिक फॉलो होणारा अॅथलीट आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग