मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022 Best 11: पाकिस्तानच्या ३ तर भारताच्या दोनच खेळाडूंना स्थान; शनाका कॅप्टन, पाहा संघ

Asia Cup 2022 Best 11: पाकिस्तानच्या ३ तर भारताच्या दोनच खेळाडूंना स्थान; शनाका कॅप्टन, पाहा संघ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 13, 2022 07:28 PM IST

आशिया चषक संपल्यानंतर ESPN क्रिकइन्फोने आशिया चषक २०२२ बेस्ट इलेव्हन बनवली आहे. यामध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर श्रीलंकन ​​संघाच्या चार खेळाडूंना आशिया चषक २०२२ बेस्ट इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

Best XI of Asia Cup 2022
Best XI of Asia Cup 2022

श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानला २३ धावांनी धुळ चारली. याबरोबरच श्रीलंकेने ६व्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मात्र, आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटू श्रीलंका संघाकडे दुर्लक्ष करत होते.

मात्र, या सर्व क्रिकेट पंडितांना श्रीलंकेने खोटे ठरवले. आशिया चषक संपल्यानंतर ESPN क्रिकइन्फोने आशिया चषक २०२२ बेस्ट इलेव्हन बनवली आहे. यामध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर श्रीलंकन ​​संघाच्या चार खेळाडूंना आशिया चषक २०२२ बेस्ट इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

या खास संघात पाकिस्तानचे तीन आणि अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना या यादीत स्थान मिळू शकले नाही. तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानचाही या संघात समावेश नाही.

ESPN क्रिकइन्फो आशिया कप २०२२ बेस्ट इलेव्हन

कुसल मेंडिस, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), विराट कोहली, इब्राहिम झादरान, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हरसांगा, मोहम्मद नवाज, भुवनेश्वर कुमार, हरिस रौफ, नसीम शाह.

दासून शनाका कर्णधार

कुसल मेंडिसने या स्पर्धेत १५६.६६ च्या स्ट्राइक रेटने १५५ धावा केल्या. तर रहमानउल्लाह गुरबाजने १६३.४४ च्या स्ट्राइक रेटने १५२ धावा केल्या आणि तीन झेल घेतले. विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर फॉर्ममध्ये परतला आणि त्याने स्पर्धेदरम्यान १४७.५९ च्या स्ट्राइक रेटने२७६ धावा केल्या.

तर इब्राहिम झादरानने मधल्या षटकांमध्ये संघासाठी उपयुक्त फलंदाजी केली. तसेच, भानुकाराजपाक्षेने अंतिम सामन्यात आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. दासून शनाकाकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याने ज्याप्रकारे कर्णधारपद भूषवले ते पाहता हा योग्य निर्णय असल्याचे दिसते.

मोहम्मद नवाजने बॅटिंग आणि बॉलिंगने चांगलेच प्रभावित केले. तर वनिंदू हसरंगा या, स्पर्धेचा मालिकावीर आहे. भुवनेश्वर कुमारने संपूर्ण स्पर्धेत ११ विकेट्स घेतल्या. हरिस आणि नसीमने पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीची फारशी उणीव भासू दिली नाही. त्यामुळे यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या