दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरवर (David Miller) कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १५ व्या हंगामातील प्रभावी कामगिरीनंतर मिलरची बार्बाडोस रॉयल्सच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. हा संघ रॉयल स्पोर्ट्स ग्रुपच्या मालकीचा आहे. रॉयल स्पोर्ट्स ग्रुप हा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचाही मालक आहे. मिलर आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडूनही खेळला आहे. मिलर सध्या गुजरातय लायन्स संघाचा भाग आहे.
बार्बाडोस रॉयल्सच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर डेव्हिड मिलरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “तो मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी आणि रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांच्यासोबत जवळून काम करेल,”
तसेच, “ माझ्यासाठी बार्बाडोस रॉयल्समध्ये सहभागी होणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आता मला कर्णधारपदाचा विशेषाधिकारही मिळाला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला हा संघ असून मी २०२२ च्या मोससमात संपूर्ण टीमसह काम करण्यास उत्सुक आहे.”
दरम्यान, मिलरला आयपीएलच्या या मोसमात गुजरात टायटन्स या नवीन संघाने विकत घेतले होते. या फ्रँचायझीला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोठा वाटा राहिला आहे. मिलर तीन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये सीपीएलमध्ये जमैका थलायवाकडून खेळला होता. त्याआधी २०१६ मध्ये तो सेंट लुसिया झुक्सचा भाग होता.
मिलरच्या आयपीएलमधील १०५ सामन्यांमध्ये २४५५ धावा आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३६.६४ इतकी आहे. मिलरने १ शतक आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या मोसमात त्याने शानदार फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सहाव्या स्थानावर होता. त्याने १६ सामन्यात ६८.७१ च्या सरासरीने ४८१ धावा केल्या. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली होती.
संबंधित बातम्या