मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022 Wrestling: सुरक्षेत गंभीर त्रुटी! कुस्तीचे सामने अचानक थांबवले

CWG 2022 Wrestling: सुरक्षेत गंभीर त्रुटी! कुस्तीचे सामने अचानक थांबवले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 05, 2022 05:46 PM IST

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्ती स्पर्धा अचानक थांबवण्यात आले आहेत.

CWG
CWG

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या सातव्या दिवशी कुस्तीचे सामने अचानक थांबवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. सामना थांबवल्यानंतर स्टेडियम रिकामे करण्यात आले असून सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंनाही स्टेडियम सोडण्यास सांगण्यात आले आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

स्पीकर पडल्याने गोंधळ

या बाबत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट करून सांगितले की, 'सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सामना काही काळासाठी स्थगित करत आहोत. परवानगी मिळताच आम्ही पुन्हा सामने सुरू करू. भारतीय वेळेनुसार ५:५० वाजता सामने सुरू होतील".

दिवसभरात कुस्तीचे पाच सामने झाले आहेत. भारताच्या दीपक पुनियाने ८६ किलो गटात पहिला सामना जिंकला. त्यानंतर पुढचा सामना सुरू होण्याआधीच छतावरून एक स्पीकर मॅटजवळ पडला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

यानंतर सर्व चाहते आणि खेळाडूंना मैदानातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. जेणेकरून संपूर्ण स्टेडियमची कसून तपासणी करता येईल. स्पीकर मॅटच्या अगदी जवळ पडला होता. अशा परिस्थितीत आयोजकांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एका प्रशिक्षकाने सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षित आहोत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते कसून तपासणी करण्यात आहे.

WhatsApp channel

विभाग