मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Chris Hemsworth: थॉर बनला 'गोल्डन गर्ल' मीराबाईचा जबरा फॅन, ट्वीट करत म्हणाला...

Chris Hemsworth: थॉर बनला 'गोल्डन गर्ल' मीराबाईचा जबरा फॅन, ट्वीट करत म्हणाला...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 05, 2022 06:45 PM IST

Chris Hemsworth Congratulate Mirabai Chanu: वेटलिफ्टर मीराबाई चानूने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलून इतिहास रचला. मीराबाईने एकूण २०१ किलो वजन उचलले. हा कॉमनवेल्थ गेम्समधील एक विक्रम आहे.

Chris Hemsworth
Chris Hemsworth

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. मीराबाईने २०१ किलो (स्नॅचमध्ये ८८ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो) वजन उचलून कॉमनवेल्थ गेम्समध्य विक्रम प्रस्थापित केला आहे.

यानंतर मीराबाईच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच, मीराबाईच्या चाहत्यांच्या यादीत सामान्य लोकच नाही तर हॉलिवूड चित्रपट 'थॉर'चा हिरो ख्रिस हेम्सवर्थ याची देखील भर पडली आहे. मीराबाईच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे दिग्गज हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ हा देखील तिचा जबरा फॅन बनला आहे.

थॉरने मीराबाईचे कौतुक करताना एक ट्वीट देखील केले आहे. ज्यामध्ये त्याने या भारतीय स्टारचे कौतुक केले आहे. आपल्या एका ओळीच्या कॅप्शनमध्ये हेम्सवर्थने लिहिले आहे की, ती खरंच पात्र आहे. अभिनंदन, मीराबाई, तु महान आहेस.

२७ वर्षीय मीराबाईने ग्लासगो येथे रौप्य आणि गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

मीराबाईने ऑलिम्पिकमध्ये केलीय रौप्य पदकाची कमाई

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते. यासह मीराबाई ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली. त्या ऑलिम्पिकमध्ये स्नॅचनंतर मीराबाई दुसऱ्या क्रमांकावर होती. मीराबाईने क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नात ११० किलो तर दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलण्यात यश मिळविले होते.

WhatsApp channel