मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG : मिल्खा सिंग यांनी जिंकल होतं पहिलं सुवर्ण, २० वर्षांपासून भारत टॉप ५ मध्ये

CWG : मिल्खा सिंग यांनी जिंकल होतं पहिलं सुवर्ण, २० वर्षांपासून भारत टॉप ५ मध्ये

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 24, 2022 01:40 PM IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत ५०३ पदके जिंकली आहेत. २००२ च्या मँचेस्टर कॉमनवेल्थ गेम्सपासून ते गत कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत भारत पदकतालिकेत टॉप पाच देशांच्या बाहेर कधीच गेला नाही.

milkha singh
milkha singh

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले पदक कुस्तीपटू रशीद अन्वरने १९३४ लंडन येथे झालेल्या खेळांमध्ये जिंकले होते. त्याच वर्षी  भारताने प्रथमच या खेळांमध्ये सहभाग घेतला होता. त्यावर्षी म्हणजेच भारताच्या पहिल्या स्पर्धेत भारतीय तुकडीमध्ये ६ खेळाडूंचा समावेश होता, त्या खेळाडूंनी ऍथलेटिक्स आणि कुस्तीमध्ये भाग घेतला होता.

मात्र, भारताला या खेळांमध्ये पहिले सुवर्ण मिळवण्यासाठी २४ वर्षे वाट पाहावी लागली. भारताला पहिले सुवर्णपदक १९५८ मध्ये कार्डिफ येथे फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांनी मिळवून दिले होते.  भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ५०३ पदके जिंकली आहेत. २००२ च्या मँचेस्टरच्या राष्ट्रकुलपासून गेल्या वेळेसच्या राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत भारत पदकतालिकेत टॉप पाच देशांमध्येच राहिला आहे.

मिल्खा सिंग यांच्यानंतर कृष्णा पुनिया हिने ५२ वर्षांनी जिंकले सुवर्ण-

डिस्कस थ्रोअर (थाळी फेक) कृष्णा पुनियाने २०१० च्या दिल्ली येथे झालेल्या खेळांमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग यांच्या यशानंतर (१९५८ मध्ये) हे यश मिळवण्यासाठी ५२ वर्षे लागली.

अमी घिया आणि कंवल ठाकर पदक जिंकणारी पहिली महिला जोडी-

कॅनडातील एडमंटन येथे झालेल्या गेम्समध्ये भारताकडून अमी घिया आणि कंवल ठाकर सिंग या दोन महिला भारतीय संघात सहभागी झाल्या होत्या. बॅडमिंटनमध्ये या दोघांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. ही जोडी पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण अमी-कंवल जोडीने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, या जोडीने कांस्यपदकाचा सामना जिंकून इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच भारतीय महिलांची जोडी ठरली.

रूपा उन्नीकृष्णन नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला

नेमबाज रूपा उन्नीकृष्णन सुवर्ण जिंकणारी पहिली महिला ठरली. १९९८ च्या क्वालालंपूर गेम्समध्ये रुपाने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

रणजीत कुमार पदक जिंकणारा पहिला पॅरा अॅथलीट

डिस्कस थ्रोमध्ये रणजीत कुमार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पॅरा अॅथलीट होता. रणजीने २००६ च्या गेम्समध्ये ही कामगिरी केली होती.

 

WhatsApp channel