मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Commonwealth Games 2022: लवकरच भारत-पाक क्रिकेटचा थरार, ‘या’ दिवशी रंगणार सामना

Commonwealth Games 2022: लवकरच भारत-पाक क्रिकेटचा थरार, ‘या’ दिवशी रंगणार सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 17, 2022 05:12 PM IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८ महिला क्रिकेट संघांचा समावेश करण्यात आला आहे. हे संघ दोन गटात विभागलेले आहेत. या दोन गटांतील टॉप २ संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

Commonwealth Games
Commonwealth Games

२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ७२ देशांतील सुमारे ४,५०० खेळाडू भाग घेणार आहेत. तर २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी १९९८ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यावेळी स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटला संधी मिळाली आहे. 

या स्पर्धेतील क्रिकेट खेळाचा पहिला सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी क्रिकेटचे सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने खेळवले जातील. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरारही अनुभवण्यास मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामना ३१ जुलै रोजी रंगणार आहे.

टीम इंडियाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. दुसरीकडे, सलामीवीर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटच्या ८ महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. हे संघ दोन गटात विभागलेले आहेत. या दोन्ही गटातील अव्वल २ संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.

अ गट : भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस

ब गट: इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका

भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (wk), यस्तिका भाटिया (wk), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.

स्टँडबाय: ऋचा घोष, पूनम यादव, सिमरन दिल बहादूर.

पाकिस्तान महिला संघ: बिस्माह मारूफ (कर्णधार), मुनीबा अली, अनम अमीन, आयमान अन्वर, डायना बेग, निदा दार, गुल फिरोजा, तुबा हसन, कैनात इम्तियाज, सादिया इक्बाल, इरम जावेद, आयशा नसीम, आलिया रियाझ, फातिमा सना, ओमामा सोहेली

WhatsApp channel