मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CJI Chandrachud : मी क्रिकेटर असतो तर राहुल द्रविडसारखा असतो, सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले?

CJI Chandrachud : मी क्रिकेटर असतो तर राहुल द्रविडसारखा असतो, सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 19, 2023 12:18 PM IST

CJI dy chandrachud fan of Rahul Dravid : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI) शनिवारी एका मीडिया ग्रुपच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टींचा खुलासा केला, ते बॉब डायलन आणि राहुल द्रविडचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले.

CJI dy chandrachud &  Rahul Dravid
CJI dy chandrachud & Rahul Dravid

भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांच्याकडे देशातील सर्वात जास्त काळ न्यायाधीश (CJI च्या कार्यकाळासह) होण्याचा विक्रम आहे. आपल्या २३ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत.

अशातच सरन्यायाधीश चंद्रचूड हे शनिवारी (१८ मार्च) एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात त्यांनी प्रलंबित प्रकरणे, न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियम पद्धत, सोशल मीडियावर न्यायपालिकेला ट्रोल करण्याचा वाढता ट्रेंड यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

या कार्यक्रमाच्या शेवटी सुत्रसंचालकाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना CJI DY चंद्रचूड यांनी सांगितले की ते संगीत आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत.

तुम्हाला संगीत आवडते का? असे सुत्रसंचालकाने विचारले असता, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, 'मला संगीत आवडते. मला संगीताचे अनेक प्रकार आवडतात. मी भारतीय क्लासिक ऐकतो. मी कुमार गंधर्वांचा खूप मोठा चाहता आहे. मी किशोरी आमोणकर यांना ऐकतो. सोबतच मी पाश्चात्य संगीतही ऐकतो. मी बॉब डायलनचा खूप मोठा चाहता आहे".

यानंतर क्रिकेटबाबत प्रश्न विचारल्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, क्रिकेट आवडते पण वेळ मिळत नाही. पण सामना संपल्यानंतर मी कधी कधी हायलाईट्स पाहतो. जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव विचारण्यात आले तेव्हा त्यांनी टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक आणि सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविडचे नाव घेतले. सोबतच त्यांनी एक मोठं वक्तव्यही केलं. ते म्हणाले की, “मी क्रिकेटर असतो तर राहुल द्रविडप्रमाणेच महान खेळाडू झालो असतो.”

चंद्रचूड यांनी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी तरुणपणी ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून अर्धवेळ काम केले. त्यांनी प्ले इट कूल, डेट विथ यू आणि संडे रिक्वेस्ट सारखे शो होस्ट केले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या