मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cheteshwar Pujara : शाहरुखमुळं चिंटूवर आफ्रिकेत उपचार झाले, पुजाराच्या वडिलांनी सांगितली खास आठवण

Cheteshwar Pujara : शाहरुखमुळं चिंटूवर आफ्रिकेत उपचार झाले, पुजाराच्या वडिलांनी सांगितली खास आठवण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 15, 2023 04:54 PM IST

Cheteshwar Pujara 100th test match, Kolkata Knight Riders चेतेश्वर पुजाराच्या वडिलांनी आपल्या मुलाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा पुजारा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना जखमी झाला होता.

Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara

भारतीय कसोटी संघाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा दिल्लीत त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पुजाराच्या १००व्या कसोटीच्या दिवशी त्याचे कुटुंबीय त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतील.

देशासाठी १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा तो भारताचा १३वा क्रिकेटपटू ठरणार आहे. पुजाराच्या १०० व्या कसोटीपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्याशी संबंधित एक खास आठवण सांगितली आहे.

चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, “आम्ही दक्षिण आफ्रिकेत असताना मी त्याच्या (पुजाराच्या) डोळ्या मी दुसऱ्यांदा आनंद पाहिला. तो तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायचा आणि या संघाकडून खेळताना त्याची हॅमस्ट्रिंग तुटली होती. त्याने राजकोटला परतावे आणि येथे शस्त्रक्रिया करावी अशी आमची इच्छा होती. पण केकेआरचा मालक शाहरुख खानने चिंटूला (चेतेश्वर पुजारा) दक्षिण आफ्रिकेत उपचार मिळावेत असा आग्रह धरला. शाहरुखच्या बोलण्यात तर्क होता. कारण रग्बी खेळाडूंना अनेकदा ही दुखापत होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांना या प्रकारच्या शस्त्रक्रियेची अधिक सवय होती”.

पुजाराला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळायला हवी

पुजाराचे वडील अरविंद यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुख खानचा विश्वास होता की चिंटूचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळायला हवी. आम्हाला पटवून देण्यासाठी त्यांनी कुटुंबातील अनेक सदस्यांना विमानाने दक्षिण आफ्रिकेला नेण्याची ऑफर दिली. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. म्हणूनच मी डॉ. शहा यांना एकट्याने दक्षिण आफ्रिकेत जाण्यास सांगितले. मात्र शाहरुख खानने मीही तिथे जावे, असा आग्रह धरला. सर्व कागदपत्रे खूप लवकर पूर्ण झाली त्यामुळे मीदेखील दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकलो".

WhatsApp channel