मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT IPL Final 2023 : गुजरात की चेन्नई, कोण रचणार इतिहास?, आयपीएलमध्ये आज जेतेपदासाठी लढत

CSK vs GT IPL Final 2023 : गुजरात की चेन्नई, कोण रचणार इतिहास?, आयपीएलमध्ये आज जेतेपदासाठी लढत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 28, 2023 09:23 AM IST

CSK vs GT IPL Final 2023 : चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे.

Chennai Superkings vs Gujarat Titans IPL Final 2023
Chennai Superkings vs Gujarat Titans IPL Final 2023 (HT)

Chennai Superkings vs Gujarat Titans IPL Final 2023 : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची फायनल मॅच आज अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज विजेतेपदासाठी भिडणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच गुजरात आणि चेन्नईचा संघ फायनलमध्ये आमने-सामने येणार असल्यामुळं रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सने मागच्या वर्षीच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. तर सीएसके आठव्या क्रमांकावर होता. त्यानंतर आता सीएसकेने यंदाच्या हंगामात मोठी झेप घेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळं आता हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीच्या संघात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत आयपीएलमध्ये चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स गतविजेता आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा दबाब दोन्ही संघांवर असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियवर गुजरातने नऊपैकी सात सामने जिंकले आहे, तर सीएसकेने तीनपैकी तिन्ही सामने गमावले आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा संघ सीएसकेच्या तुलनेत अधिक बलाढ्य मानला जात आहे. शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि राशिद खान हे चांगल्याच फॉर्मात असल्यामुळं सीएसकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सीएसकेकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्व्हॉय चांगली फलंदाजी करत आहे. अंबाती रायडू, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी हे मधल्या फळीत संघाला तारताना दिसत आहे. तर दुसरीकडे दीपक चाहर, महेश तिक्षणा आणि पथिराना घातक गोलंदाजी करत विरोधी संघाला नामोहरम करताना दिसत आहे. त्यामुळं दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी तगडी असल्यामुळं आजचा सामना चुरशीचा होणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा हा अखेरचा आयपीएल असल्यामुळं मोठ्या संख्येने चाहते नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी येणार आहे.

गुजरात टायटन्सची संभावित प्लेईंग इलेव्हन- हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल

चेन्नई सुपर किंग्जची संभावित प्लेईंग इलेव्हन- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, महिष तीक्षणा, मथिश पथिराना आणि तुषार देशपांडे

WhatsApp channel