मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Chahal TV IND vs NZ: टीम इंडियाची अलीशान ड्रेसिंग रूम बघितलीय का? चहल टीव्हीनं घडवली सफर

Chahal TV IND vs NZ: टीम इंडियाची अलीशान ड्रेसिंग रूम बघितलीय का? चहल टीव्हीनं घडवली सफर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 21, 2023 10:59 AM IST

team india dressing room raipur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चहल टीव्ही ड्रेसिंग रूमची पाहणी करताना दिसत आहे.

team india dressing room raipur
team india dressing room raipur

Yuzvendra Chahal Ind vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज शनिवारी (२१ जानेवारी) रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला वनडे १२ धावांनी जिंकला होता. अशा स्थितीत दुसरा वनडे जिंकून मालिका जिंकण्याचे रोहित ब्रिगेडचे लक्ष्य असेल. उभय संघांमधील हा सामना दुपारी १.३० वाजल्यापासून खेळवला जाईल.

दुसऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या चहल टीव्हीच्या माध्यमातून ड्रेसिंग रूमचे सर्वेक्षण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये चहल म्हणतोय की, 'आज आम्ही ड्रेसिंग रूमची सहल घडवणार आहोत.' त्यानंतर चहलने सर्वांची ओळख करून दिली. व्हिडिओमध्ये चहल इशान किशन सोबत विनोद करताना दिसत आहे.

यानंतर चहल भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या दिशेने गेला. रोहितने चहलशी हस्तांदोलन केले आणि म्हटले की 'तुझे भविष्य चांगले आहे.' त्यानंतर चहल फूड कोर्टच्या दिशेने जातो आणि चाहत्यांना स्वादिष्ट पदार्थांचे दर्शन घडवतो.

दरम्यान भारतीय संघाला वनडेमध्ये नंबर-१ रँकिंग मिळवण्यासाठी न्यूझीलंडला ३-० ने पराभूत करावे लागणार आहे. पहिल्या वनडेत ३४९ धावा करूनही भारतीय संघाला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागला. किवी फलंदाज मायकल ब्रेसवेलने १४० धावांची खेळी करत किवी संघाला लक्ष्याच्या अगदी जवळ नेले होते.

दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संभाव्य प्लेइंग ११

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन.

WhatsApp channel

संबंधित बातम्या