Neeraj Chopra: गोल्डसोबत मनही जिंकलस! तिरंग्यावर सही मागितल्यानंतर नीरज चोप्राचे अभिमानास्पद कृत्य!
World Athletics Championships 2023: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे.
Neeraj Chopra refused to sign an Indian flag: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरणारा नीरज चोप्रा हा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. गोल्डन बॉयच्या या दमदार कामगिरीनंतर एक हंगेरियन चाहती त्याच्याकडे आली आणि तिने नीरज चोप्राकडे तिरंग्यावर सही केली. मात्र, यानंतर नीरज चोप्राने केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या स्पर्धेत गोल्डन सुवर्ण कामगिरी केल्यानंतर एका हंगेरियन महिलेने नीरज चोप्राकडे मागितली. मात्र, नीरजने राष्ट्रध्वजावर सही देण्यास नकार दिला आणि त्या महिलेला नाराजही केले नाही. नीरजने या महिलेच्या टीशर्टचच्या बाहीवर सही केली. नीरजची ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी नीरजच्या कृत्याचे कौतुक केले आहे.
नीरज चोप्राने पात्रता फेरीच्या पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटरचा थ्रो फेकला. हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ठरला, ज्यामुळे त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. या थ्रोमुळे नीरज चोप्राला पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळाले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नीरज चोप्राने ८८.१७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रावर पैशांचा पाऊस पडला. अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला बक्षीस म्हणून ७० हजार डॉलर्स मिळाले. ही किंमत भारतीय रुपयात मोजली तर अंदाजे ५८ लाख रुपये होतात. या स्पर्धेतरौप्यपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ३५ हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे २९ लाख रुपये मिळाले.
विभाग