मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cameron Green: कॅमरुन ग्रीन होणार मालामाल? IPL एन्ट्रीबाबत भारतीय दिग्गजानं स्पष्टच सांगितलं

Cameron Green: कॅमरुन ग्रीन होणार मालामाल? IPL एन्ट्रीबाबत भारतीय दिग्गजानं स्पष्टच सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 26, 2022 02:38 PM IST

Wasim Jaffer on cameron green ipl: ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने तिसऱ्या टी-20 सामन्यात २१ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातही त्याने ३० चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. त्याच्या फंलदाजीमुळे सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. वसीम जाफरनेही एक पोस्ट शेअर केली आहे.

Cameron Green
Cameron Green

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने कांगारूंचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. भारताकडून विराट आणि सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली.

तर ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूत ५२ आणि टीम डेव्हिडने २७ चेंडूत ५४ धावा केल्या. ग्रीनने तिसऱ्या सामन्यात अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या वादळी खेळीमुळे अनेकजण प्रभावित झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरही ग्रीनच्या फलंदाजीने प्रभावित झाला आहे. जाफरने ग्रीनवर एक मीम बनवले आहे. IPL आणि ग्रीन यांचा संबंध जोडून असलेले हे मीम सध्या प्रचंड चर्चेत आले आहे.

 

कॅमरुन ग्रीनने भारताविरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये ३० चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. त्याला त्या सामन्यात "मॅन ऑफ द मॅच" म्हणूनही गौरविण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाही. या मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची जागा घेतली आहे.

भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली होती. ग्रीन अद्याप आयपीएल खेळलेला नाही, परंतु २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी तो उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

कॅमरुन ग्रीनने आतापर्यंत १४ कसोटी, १२ एकदिवसीय आणि ४ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ७२७ , २७० आणि १२० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ८ अर्धशतके झळकावली आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या