मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Brett Lee - Jasprit Bumrah: दुखापतीतून कसं सावरणार? ब्रेट लीचा बुमराहला लाखमोलाचा सल्ला

Brett Lee - Jasprit Bumrah: दुखापतीतून कसं सावरणार? ब्रेट लीचा बुमराहला लाखमोलाचा सल्ला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 09:54 PM IST

Brett Lee on Jasprit Bumrah injury: दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने जसप्रीत बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ब्रेट लीने स्वतःच्या करिअरमध्ये १६ वेळा घोट्याची शस्त्रक्रिया केली होती.

Brett Lee
Brett Lee

ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट लीने जसप्रीत बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बुमराहला स्ट्रेस रिएक्शनचा आजार आहे. यामुळे तो जवळपास ६ आठवडे मैदानाबाहेर असणार आहे. लीने बुमराह तसेच इतर वेगवान गोलंदाजांना सल्ला दिला आहे की, गोलंदाजांनी जिममध्ये जास्त भार उचलणे टाळावे.

जास्त वजन उलल्याने बुमराहला दुखापत

यूट्यूबवर बोलताना ली म्हणाला की, "आजच्या काळात मी बहुतेक गोलंदाज जिममध्ये वजन उचलताना पाहतो. जिममध्ये वेळ घालवणे आवश्यक आहे, परंतु तुम्हाला जास्त वजन उचलण्याची गरज नाही. जर तुम्हाला वेगवान गोलंदाजी करायची असेल तर तुमच्या शरीरातील स्नायू पातळ असणे महत्त्वाचे आहे. जास्त वजन उचलल्याने हाताची हालचाल कमी होते."

सध्या, रिकव्हरीसाठी बर्फ बाथचा वापर केला जातो, परंतु ब्रेट लीने त्यावर टीका केली आहे. लीच्या मते, गोलंदाजाच्या रिकव्हरीमध्ये त्याची कोणतीही भूमिका नाही.

रिकव्हरीसाठी ब्रेट ली काय करायचा

ब्रेट ली जेव्हा दुखापतीने त्रस्त व्हायचा तेव्हा तो काय करायचा हे देखील त्याने सांगितले आहे. तो म्हणाला की, मी रिकव्हरीसाठी कोरड्या वाळूमध्ये धावत असे. लीचा असा विश्वास आहे की यामुळे घोट्यावर, पाठीवर आणि गुडघ्यांवर ताण येतो. त्यामुळे ली याला हिरव्या गवतावर जास्त वेगाने धावण्यास मदत मिळायची. विशेष म्हणजे ब्रेट लीने स्वतःच्या करिअरमध्ये १६ वेळा घोट्याची शस्त्रक्रिया केली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या