मास्टर्स मुंबई 'श्री'मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  मास्टर्स मुंबई 'श्री'मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई

मास्टर्स मुंबई 'श्री'मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई

Published Feb 28, 2025 11:24 AM IST

Bodybuilding Competition In Mumbai : मुंबईच्या मालाड पूर्वेला कासम बागेतील दीनदयाल उपाध्याय मैदानावर शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. यामध्ये हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता.

मास्टर्स मुंबई 'श्री'मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई
मास्टर्स मुंबई 'श्री'मध्ये संकेत भरम, विष्णू देशमुख अव्वल, तर रेखा शिंदे बनली मिस मुंबई

भारतात मुंबईला शरीरसौष्ठवाची ताकद बनविताना शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत अटीतटीच्या पीळदार संघर्षात जय भवानी व्यायामशाळेच्या वैभव गोळेने बाजी मारली. तसेच महिलांच्या शरीरसौष्ठवात रेखा शिंदेने आपले वर्चस्व दाखविताना मिस मुंबइवर आपलेच नाव कोरले. 

ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक प्रकारात साहिल सावंत विजेता ठरला. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत संकेत भरम (४०-५० वर्षे), संसार राणा (५०-६० वर्षे) आणि विष्णू देशमुख ( ६० वर्षावरील) यांनी सोनेरी यश मिळवले.

मालाड पूर्वेला कासम बागेतील दीनदयाल उपाध्याय मैदानावर हजारो शरीरसौष्ठवप्रेमींच्या उपस्थितीत तब्बल पाऊणेदोनशे ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंचा पीळदार थरार रंगला. ओम जय वरदानी ट्रस्ट आयोजित बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली.

ज्युनियर मुंबई श्रीच नव्हे तर फिजीक प्रकारात खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विस्फारणारा होता. तसेच मास्टर्स मुंबई श्रीलाही मोठ्या संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्वच गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदेने आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखताना मिस महाराष्ट्रापाठोपाठ मिस मुंबईचाही मान पटकावला. ममता येझरकर उपविजेती ठरली.

ज्युनियर मुंबई श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत वैभव गोळेने आयुष तांडेल, साहिल सावंत आणि अर्पण सकपाळचे कडवे आव्हान मोडीत काढले. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेतही तगडे खेळाडू उतरल्यामुळे उपस्थित असलेल्या वयस्कर क्रीडाप्रेमींचीही छाती अभिमानाने फुगली. 

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे संस्थापक यशवंत बामगुडे, काशीराम कदम, एकनाथ निवंगुणे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी निवंगुणे, वसंत कळंबे, सुनील गोरड, शांताराम निवंगुणे, विजय भोसले यांच्यासह शरीरसौष्टव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, किट्टी फणसेका सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, राजेश निकम यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्युनियर मुंबई श्रीचा निकाल :

५५ किलो वजनी गट : १. सिद्धांत लाड (परब फिटनेस), २. दर्शन सावंत (द फ्लेक्स जिम), ३. ऋषिराज दुबे (बोवलेकर जिम), ४. कार्तिक जाधव (ए फिटनेस), ५. साईराज कारकर (प्रशांत फिटनेस);

६० किलो : १. वंश परमार (जय भवानी ),२. जतिन मेश्राम (मासाहेब जिम), ३. श्रवण कुलगुडे (ओम जयवर्धन जिम), ४. सुमित विश्वकर्मा (स्टील बॉडी जिम), ५. विवेक भिसे (फ्लेक्स जिम);

६५ किलो : १. अर्पण सकपाळ (परब फिटनेस), २. सोहम तोरणे (माउंटन जिम), ३. मंथन पाटील (बॉडी वर्कशॉप), ४. ओम मांजलकर (छावा प्रतिष्ठान), ५. दिनेश उतेकर (पारिजात जिम);

७० किलो : १. साहिल सावंत (मासाहेब जिम), २. यश मोहिते (बॉडी वर्कशॉप), ३. सुरेश रे (गॉडस जिम), ४. दत्ता चव्हाण (परब फिटनेस), ५. अथर्व कांबळे (एस पी फिटनेस);

७५ किलो : १.वैभव गोळे (जय भवानी ), २. समर्थ कोथळे (सर्वेश्वर जिम), ३. यश कारंडे (परब फिटनेस), ४. तनिष राठोड (परब फिटनेस), ५. विघ्नेश चव्हाण (फाईन फिटनेस);

७५ किलोवरील : १. आयुष तांडेल (परब फिटनेस, २. जीवन सपकाळ (परब फिटनेस), ३. नाईस गुप्ता (प्रशिक फिटनेस, ४. रियान कोळी (गुरुदत्त जिम), ५. याकूब सर्वया (मांसाहेब जिम).

ज्युनियर मुंबई श्री : वैभव गोळे

मास्टर्स मुंबई श्री (४० ते ५० वर्षे)

१. संकेत भरम (परब फिटनेस

२. दीपक कोरी (मांसाहेब जिम)

३. अशोक देवाडिगा (मुकेश पुरव जिम).

मास्टर्स मुंबई श्री (५० ते ६० वर्षे)

१. संसार राणा (ग्रोवर जिम

२. संतोष रामचंद्रन (मांसाहेब जिम)

३. राजेश करबेको (युनिटी फिटनेस)

मास्टर्स मुंबई श्री (६० वर्षांवरील)

१. विष्णू देशमुख (गजानन केणी),

२. प्रकाश कासले (जय हनुमान),

३. ओनेल डीमेलो (मांसाहेब जिम)

ज्युनिअर मुंबई मेन्स फिजिक:

१. साहिल सावंत (मांसाहेब जिम), २. वंश परमार (जय भवानी), ३. दर्शन सावंत (द फ्लेक्स जिम), ४. आहेरफ बेग (एस जी फिटनेस), ५. ओम मांजलकर (छावा फिटनेस)

मिस मुंबई महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे (महाराष्ट्र पोलीस), २. ममता येझरकर (फोकस फिटनेस), ३. किमया बेर्डे (फ्लेक्स फिटनेस), ४. राजश्री मोहिते (केंझो फिटनेस), ५. लाविना नरोना (वर्कआउट फिटनेस).

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग