मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक व मालक बिल गेट्स यांचा जावई नायल नासेर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी लढणार आहे. तो इजिप्तच्या वतीने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांची मुलगी जेनिफरसोबत ३३ वर्षीय नस्सरचे लग्न झाले आहे.
नासर हा प्रोफेशनल घोडेस्वार असून तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभागी होत आहे. २०२४ ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीचे तीन स्पर्धा होणार आहेत. यात ड्रेसेज, इव्हेंटिंग आणि जंपिंगचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही स्पर्धा होतात. नासर वैयक्तिक अश्वारूढ उडी स्पर्धेत भाग घेणार आहे.
नायल नासार ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने इजिप्तचे प्रतिनिधित्व केले होते. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठीही तो पात्र ठरला होता. लहान वयातच त्याचे खेळावरील प्रेम सुरू झाले. ३३ वर्षीय नासरचा जन्म शिकागोमध्ये झाला आणि तो कुवेतमध्ये वाढला. त्याचे पालक मूळचे इजिप्शियन आहेत.
बिल गेट्सची माजी पत्नी आणि नासरची सासू मेलिंडा यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. नायरचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, "तुला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना पाहून मी खूप उत्साहित आहे. मी तुला शुभेच्छा देते."
नायल नासर आणि जेनिफर गेट्स २०१७ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी जानेवारी २०२० मध्ये त्यांच्या रिलेशनशीपची घोषणा केली. सुमारे २० महिन्यांनंतर, नासार आणि जेनिफरने ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्न केले. हा विवाह न्यूयॉर्कमध्ये झाला. या वर्षी मार्चमध्ये हे जोडपे एका मुलीचे पालक बनले.