मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bhuvneshwar Kumar: पॉवरप्लेमध्ये हिरो-डेथ ओव्हर्समध्ये विलन, १९ व्या षटकात भुवीला होतंय तरी काय?
Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar Kumar

Bhuvneshwar Kumar: पॉवरप्लेमध्ये हिरो-डेथ ओव्हर्समध्ये विलन, १९ व्या षटकात भुवीला होतंय तरी काय?

21 September 2022, 11:54 ISTRohit Bibhishan Jetnavare

Bhuvneshwar Kumar IND vs AUS 1st T20: भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे. भुवी नवीन चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये आपल्या स्वींगची जादू दाखवतो. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये तो डेथ ओव्हर्समध्ये (१७व्या आणि १९व्या षटकात) चांगलाच महागडा ठरला आहे.

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भारत आता ०-१ ने पिछाडीवर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी

२०९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ५२ रन्स दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. युझवेंद्र चहलच्या बाबतीतही तसेच झाले, चहलने केवळ ३.२ षटकात ४२ धावा दिल्या. तर प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षल पटेलने ४ षटकात ४९ धावा दिल्या.

१९ वे षटक भुवीसाठी भयानक स्वप्न

विशेष म्हणजे, भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे. भुवी नवीन चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये आपल्या स्वींगची जादू दाखवतो. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये तो डेथ ओव्हर्समध्ये (१७व्या आणि १९व्या षटकात) चांगलाच महागडा ठरला आहे. भुवनेश्वर कुमार स्लॉग ओव्हर्समध्ये ऑफ-साइड वाइड लाइन यॉर्कर्सवर अवलंबून असतो. परंतु आशिया चषकात त्याच्या या चाली फोल ठरल्या.

भुवीसाठी १९ वे षटक भयानक स्वप्न ठरत चालले आहे. आशिया चषकापासून सुरू झालेली ही मालिका आजतागायत सुरू आहे. पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासोबत खेळलेला पहिला T20I सामना गमावला आहे. या तिन्ही सामन्यातील १९ वे षटक भुवनेश्वर कुमारने टाकले आहे.

भुवनेश्वर कुमारकडे २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ७७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. भुवीला टीम मॅनेजमेंट टेस्टमध्ये संधी देत नाही. जेणेकरुन त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अधिक लक्ष केंद्रित करता येईल. तो टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने तो महत्त्वाचा सदस्य आहे. पॉवरप्ले दरम्यान भुवनेश्वर कुमार ५.६६ च्या शानदार इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी करतो. परंतु जसजसा चेंडू जुना होतो, तसतशी भुवीची धारही बोथट होऊ लागते आणि त्याचा ५.६६ चा इकॉनॉमी रेट डेथ ओव्हरमध्ये ९.२६ पर्यंत घसरतो.

भुवनेश्वर कुमारची डेथ ओव्हर्समधील कामगिरी

भारत-पाक सामना आशिया चषक २०२२

पाकिस्तानला शेवटच्या दोन षटकात २६ धावांची गरज होती. भुवीने १९ व्या षटकात १९ धावा दिल्या.

(भुवनेश्वरचे ते षटक: १ (वाईड), १, ६, १ (वाईड), १, ४, १, ४)

भारत-श्रीलंका आशिया चषक २०२२

श्रीलंकेला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. भुवीने १९ व्या षटकात १४ धावा दिल्या.

भुवीचे षटक: १, १, १ (वाइड), १ (वाइड), ४, ४, १, १,