मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भुवीने २०० kmph वेगाने टाकला चेंडू, अख्तरचा विक्रम मोडला पण टेक्निकली

भुवीने २०० kmph वेगाने टाकला चेंडू, अख्तरचा विक्रम मोडला पण टेक्निकली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 27, 2022 01:12 PM IST

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने टाकलेल्या दोन चेंडूंचा वेग २०० किमी प्रतितास इतक्या वेगाने असल्याचं टेक्निकल गोंधळामुळे नोंद झालं असलं तरी हा विक्रम नोंद होणार नाही.

भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार (फोटो - एपी)

Bhuvneshwar Kumar Bowling speed: क्रिकेटमध्ये जगात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) नावावर आहे. २००३ मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने १६१.३ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने या विश्वविक्रमाची नोंद केली होती. आतापर्यंत यापेक्षा वेगाने चेंडू टाकण्याची कामगिरी अद्याप कोणत्याच गोलंदाजाला करता आलेली नाही. मात्र भारत आणि आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा विक्रम मोडला. अर्थात हा विक्रम नोंद होणार नाही.

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (bhuvneshwar kumar) दोन चेंडू २०० किमी प्रतितास वेगापेक्षा जास्त वेगाने टाकल्याचं स्क्रीनवर झळकले. डावाच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्यानं २०१ किमी प्रतितास वेगाने तर तिसरा चेंडू २०८ किमी प्रतितास वेगाने टाकला. टीव्हीवर स्पीडगनने दाखवलेल्या आकड्यांनी सगळेच आश्चर्यचकीत झाले. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे नोंद झालेल्या या वेगानंतर सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला. १२ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आयर्लंडकडून टेक्टरने ३३ चेंडूत तुफान फटकेबाजी करत नाबाद ६४ धावा केल्या. टेक्टरच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडने भारतासमोर १०९ धावांचे आव्हान ठेवले.

भारतीय संघ फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा इशान किशनने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ११ चेंडूत २६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवसुद्धा लगेच बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा आणि हार्दिक पांड्या यांना फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. संघाला १५ धावांची गरज असताना पांड्या बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा आणि दिनेश कार्तिक यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग