मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes IPL 2023 : स्टोक्सचा विरोधी संघांना इशारा, सराव सत्रातील हे षटकार तर पाहा!

Ben Stokes IPL 2023 : स्टोक्सचा विरोधी संघांना इशारा, सराव सत्रातील हे षटकार तर पाहा!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2023 05:14 PM IST

Ben Stokes net practice IPL 2023 : आयपीएल २०२३ पूर्वी बेन स्टोक्स अतिशय आक्रमक फॉर्ममध्ये दिसत आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना स्टोक्सने एकापाठोपाठ एक षटकारांचा पाऊस पाडला.

Ben Stokes IPL 2023
Ben Stokes IPL 2023 (CSK TWITTER)

Ben Stokes net practice IPL 2023 video : आयपीएल २०२३ चा (IPL 2023) थरार ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्याआधी सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. संघात उपस्थित असलेले विदेशी खेळाडूही आपापल्या फ्रँचायझींमध्ये सामील होत आहेत. या दरम्यान, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही भारतात पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आहे.

आयपीएलच्या मिनी लिलावात चेन्नईने १६.२५ कोटींची किंमत देऊन स्टोक्सचा संघात समावेश केला होता. त्याने आयपीएलपूर्वी सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टोक्स षटकार मारताना दिसत आहे.

CSK च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बेन स्टोक्सचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्टोक्स एकामागून एक षटकार मारत असल्याचे तुम्ही पाहू शकता. स्टोक्सने शुक्रवारी सकाळी चेन्नई गाठली आणि संध्याकाळी सराव सत्राला सुरुवात केली. त्याने ओपन-नेट सत्रात दोन जबरदस्त षटकार मारले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने वेगवान गोलंदाजाला पहिला षटकार मारला. त्याचवेळी त्याने थ्रोडाऊन स्पेशालिस्टवर दुसरा षटकार मारला.

त्याच्या दोन्ही शॉट्सवरून तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने आपल्या संघासाठी सामना जिंकणारी खेळी खेळली होती.

स्टोक्सने आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये धोकादायक कामगिरी केली आहे. त्याने २०१७ मध्ये आयीपएल पदार्पण केले. स्टोक्सने आतापर्यंत ४२ डावात ९२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. स्टोक्सची सर्वोत्तम धावसंख्या १०७ धावा आहे. त्याने ३७ डावात २८ विकेट्सही घेतल्या आहेत. स्टोक्सची सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ३ बळी अशी आहे.

आयपीएलच्या या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK VS GG) यांच्यात होणार आहे. गेल्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब होती. मात्र यावेळी संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या