मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes : स्टोक्सला भावना अनावर, शेवटी बोललाच

Ben Stokes : स्टोक्सला भावना अनावर, शेवटी बोललाच

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 20, 2022 02:14 PM IST

स्टोक्स नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यानंतर त्याच्यावर लगेच कर्णधार पदाची जबाबदारी टाकण्यात आली. तो एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार झाला. विशेष म्हणजे, स्टोक्सने मानसिक स्वास्थासाठी काही काळ क्रिकेटमधून ब्रेकही घेतला होता.

Ben Stokes
Ben Stokes

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्सने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सच्या या तडकाफडकी निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा मोठा धक्का होता. अनेक जणांनी आयसीसीच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली. शेवटी बेन स्टोक्सनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आम्हाला इंधनावर चालणाऱ्या गाड्या समजण बंद करा', अशा शब्दात स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

एका मुलाखतीत स्टोक्स म्हणाला की,  ‘आम्ही काही गाड्या नाही आहोत. जे की इंधन भरले सुरु झालो. तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता त्यानंतर लगेच, वनडे सुरू होते. हे अति  होत आहे. तसेच, मुर्खपणाचे आहे’.

 दरम्यान,  स्टोक्स नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यानंतर त्याच्यावर लगेच कर्णधार पदाची जबाबदारी टाकण्यात आली. तो एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार झाला.  विशेष म्हणजे, स्टोक्सने मानसिक स्वास्थासाठी काही काळ क्रिकेटमधून ब्रेकही घेतला होता.

सोबतच स्टोक्स पुढे म्हणाला की, ‘मला असे वाटते की सध्या जे क्रिकेटचे तीन्ही फॉरमॅट खेळत आहेत, त्यांच्यासाठी क्रिकेटचा अतिरेक आहे. क्रिकेट खेळणं आधीपेक्षा जास्त कठिण झाले आहे. मी आधी तीन्ही फॉरमॅट खेळत होतो आणि संपूर्ण १०० टक्के योगदान देत होतो. पण आता माझे शरीर त्यासाठी परवानगी देत नाही आहे. तसेच, फ्रेंचायझी क्रिकेटही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंवरचा मानसिक ताण हा दिवसेंदिवस वाढत जात आहे’.

स्टोक्सची वनडे कारकीर्द-

३१ वर्षीय स्टोक्सने आतापर्यंत १०५ एकदिवसीय सामन्यांच्या ९० डावांमध्ये २९२४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.४५ आणि स्ट्राइक रेट ९५.२७ इतका राहिला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १०२ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ३ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत.

त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने ८७ डावात ७४ बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६.०३ एवढा राहिला आहे. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी ६१ धावांत ५ विकेट अशी आहे.

WhatsApp channel