भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी सय्यद मोदी इंटरनॅशनल २०२४ मध्ये त्यांच्या चमकदार कामगिरीने भारतीय बॅडमिंटनला नवीन उंचीवर नेले. सिंधूने चीनच्या वू लुओ यू हिला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले, तर लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
आज रविवारी १ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात, पीव्ही सिंधूने जबरदस्त कामगिरी केली आणि सरळ गेममध्ये २१-१४, २१-१६ असा विजय मिळवला. सिंधूसाठी हे जेतेपद खूप खास होते कारण तिने २ वर्षे, ४ महिने आणि १८ दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा जिंकली. यापूर्वी २०१७ आणि २०२२ मध्येही तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
सामन्यानंतर पीव्ही सिंधूने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त करत लिहिले आहे, की "२ वर्षे, ४ महिने आणि १८ दिवस. माझी टीम, माझा अभिमान." सिंधूने तिचा संघ आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आणि हा विजय तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे वर्णन केले.
पीव्ही सिंधूने फायनलच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. तिने पहिल्या गेममध्ये ८-५ अशी आघाडी घेतली आणि ब्रेकपर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने वू लुओ यूवर दबाव टाकला आणि पहिला गेम २१-१४असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये चीनच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि गुणसंख्या १०-१० अशी बरोबरी केली, परंतु पीव्ही सिंधूने संयम आणि अनुभव दाखवत वूच्या चुकांचा फायदा घेत दुसरा गेम आणि २१-१६ ने विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा २१-६, २१-७ असा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. सेनने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट नियंत्रण दाखवत प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही.
पहिल्या गेममध्ये सेनने ८-० अशी आघाडी घेतली आणि जेसन टिओहच्या सलग चुकांचा फायदा घेत हा गेम २१-६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सेनने ब्रेकमध्ये १०-१ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस २१-७ असा विजय मिळवला.
संबंधित बातम्या