मराठी बातम्या  /  Sports  /  Babar Azam Stopped By Excise Officers Asked To Change His Car Number Plate Pakistan Cricket Team

Babar Azam Car : भर रस्त्यात बाबर आझमची गाडी थांबवली, नंबर प्लेटवरून अधिकाऱ्यांनी फटकारलं, जाणून घ्या

Babar Azam Car
Babar Azam Car
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
May 20, 2023 06:47 PM IST

Babar Azam Car : आपल्या कर्णधारपदाखाली बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली. तसेच पाकिस्तानला मालिका ४-१ ने जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बाबरने न्यूझीलंडविरुद्ध २७६ धावा केल्या.

babar azam car stopped by excise officers : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाक कॅप्टनला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाने रस्त्यात थांबवले होते.

ट्रेंडिंग न्यूज

पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला त्याच्या मूळ गावी लाहोर येथे गाडी चालवत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवले आणि वॉर्निंग दिली. नियमित राउंडवर निघालेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एक पांढऱ्या रंगाची ऑडी कार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसली. यानंतर अधिकाऱ्यांनी कार मालकाला थांबवून खडसावले.

वृत्तानुसार, बाबरच्या कारवरील नंबर प्लेट सरकारच्या निर्धारित मानकांनुसार नव्हती, बाबरच्या नंबर प्लेटवरील आकडे खूपच लहाना होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी बाबरला नंबर प्लेट लवकरच बदलण्याचा इशारा दिला. यानंतर अधिकाऱ्यांनी आवश्यक चौकशी करून बाबरसोबत फोटोही काढले. आता हे फोटो प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत.

आपल्या कर्णधारपदाखाली बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली. तसेच पाकिस्तानला मालिका ४-१ ने जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बाबरने न्यूझीलंडविरुद्ध २७६ धावा केल्या. संपूर्ण मालिकेत तो चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी बाबर अनुपलब्ध आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये दोन शतकांसह ३६३ धावा करणारा फखर जमान आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. फखरच्या कामगिरीने एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे.

WhatsApp channel