मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Axar Patel Wedding : अक्षरचा रोमँटिक डान्स, विंटेज कारमधून वरात... लग्नाचे हे व्हिडीओ बघितले का?

Axar Patel Wedding : अक्षरचा रोमँटिक डान्स, विंटेज कारमधून वरात... लग्नाचे हे व्हिडीओ बघितले का?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 12:20 PM IST

axar patel wedding videos and photos : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. गुजरातच्या वडोदरा येथे गुरुवारी (२६ जानेवारी) त्याने मंगेतर मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली.

Axar Patel Wedding
Axar Patel Wedding

Axar Patel Wedding with Meha: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलने लग्नगाठ बांधली आहे. त्याने आपली मंगेतर मेहा पटेलसोबत सात फेरे घेतले. दोघांची एंगेजमेंट गेल्या वर्षी झाली होती. अक्षर आणि मेहा पटेल यांचे गुरुवारी (२६ जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या लग्नसोहळ्यात जयदेव उनाडकटसह अनेक क्रिकेटपटूही पोहोचले होते. तर, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमुळे विराट कोहली, रोहित शर्मासारखे स्टार भारतीय खेळाडू लग्नाला पोहोचू शकले नाहीत. अक्षरच्या लग्नाच्या मिरवणुकीचा व्हिडिओही समोर आला आहे.

अक्षर पटेल आणि मेहा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मेहा आणि अक्षर यांची गेल्या वर्षीच एंगेजमेंट झाली होती. आता दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. अक्षर पटेलने विंटेज कारमधून लग्नाची मिरवणूक काढली. लग्नानंतरचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अक्षर आणि मेहा फोटोशूट करताना दिसत आहेत.

अक्षर आणि मेहाचे डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये हे जोडपे संगीत कार्यक्रमामध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याचवेळी वरमाला आणि सात सात फेरे घेतानाचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. स्वत: मेहा पटेलनेही ट्विटरवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

मेहा कोण आहे?

मेहा पटेल ही व्यवसायाने आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करत असते. अक्षर पटेल आणि मेहा अनेकवेळा एकत्र सुट्टी घालवताना दिसले आहेत. नुकतेच दोघेही अमेरिकेला गेले होते.

मेहाने अक्षर पटेलच्या एका हातावर अक्ष हे नाव गोंदवले आहे. मेहा पटेलला रील बनवण्याचीही खूप आवड आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत रील शेअर करत असते. मेहाचे २७ हजार फॉलोअर्स आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या