Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला-avani lekhara wins gold medal in womens 10m air rifle paris paralympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला

Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला

Aug 30, 2024 04:09 PM IST

Avani Lekhara Wins Gold Medal : अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिले पदक आहे.

Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला
Paralympics 2024 : भारताच्या अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी, नेमबाजीत स्वतःचाच विक्रम मोडून इतिहास रचला

भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीसोबतच भारताच्या मोना अग्रवाल हिनेही कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. अवनीचा हा विजयही ऐतिहासिक आहे कारण तिने नवा पॅरालिम्पिक विक्रम केला आहे.

अवनी लेखरा आणि दक्षिण कोरियाच्या युनरी ली यांच्यात शेवटच्या शॉटपर्यंत अत्यंत चुरशीची लढत झाली. अवनी शेवटच्या शॉटपर्यंत रौप्य पदकाच्या स्थानावर राहिली, पण तिने शेवटच्या शॉटवर १०.५ गुण मिळवे. त्याच वेळी, कोरियन नेमबाज शेवटचा शॉट चुकला, तिला फक्त ६.८ गुण मिळाले. यामुळे कोरियन शूटरचा अंतिम स्कोअर २४६.८ इतकाच राहिला.

अवनी लेखराने तिचाच विक्रम मोडला

अवनी लेखरा वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तेथे तिने अंतिम फेरीत २४९.६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅरालिम्पिकचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनीने २४९.७ गुण मिळवत स्वतःचा विक्रम सुधारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

गेल्या वेळी टोकियो पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेती चीनची क्युपिंग झांग हिने या कांस्य पदक जिंकले.

अवनी लेखरा आता सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. तिच्याआधी, आजपर्यंत भारताच्या एकाही नेमबाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

अवनी लेखरा हिचे पॅरालिम्पिक २०२४ मधील आव्हान अद्याप संपलेले नाही कारण ती महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्येही खेळणार आहे. अवनीने गेल्या वेळी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, मात्र यावेळी तिला तिच्या पदकाचा रंग बदलायला आवडेल.