मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा जोडीचा पराभव

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा जोडीचा पराभव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 09:30 AM IST

Sania Mirza and Rohan Bopanna in Australian Open: ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Sania Mirza- Rohan Bopanna
Sania Mirza- Rohan Bopanna

Australia Open 2023: ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) यांना ब्राझीलच्या राफेल माटोस (Rafael Matos) आणि लुईसा स्टेफनी (Luisa Stefani) जोडीकडून ७-६ आणि ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह कारकिर्दीतील शेवटच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये सानिया मिर्झाच्या हाती निराशा लागली. सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी टेनिसला अलविदा करणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या डब्लूटीए १००० दुबई टेनिस चॅम्पियनशिप तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल.

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्ण यांनी उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७-६(५) ६-७(५) १०-६ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय जोडीने सामन्याची चमकदार सुरुवात करत पहिला सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. मात्र, दुसरा सेट ६-७ अशा फरकाने गमावला. या स्पर्धेतील पहिला सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले आणि तिसरा सेट १०-६ अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सानियाची ही शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे तिने या आधी स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रँडस्लॅम जिंकून आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याचा तिचा प्रयत्न असेल.सानिया मिर्झाने आतापर्यंत ३ मिश्र दुहेरी आणि ३ महिला दुहेरीसह एकूण ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तिने २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन आणि २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीमध्ये जिंकले. याआधी तो २०११ मध्ये फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी २००९ मध्ये विम्बल्डन, २०१२ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये मिश्र दुहेरीत यूएस ओपन जिंकले. सानिया मिर्झा आणि महेश भूपतीने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

WhatsApp channel

विभाग