Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड' दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड' दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर

Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड' दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर

Published Jul 30, 2024 05:01 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू पोहोचले तेव्हा त्यांचे किट देऊन स्वागत करण्यात आले. फोन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त या किटमध्ये कंडोमची पाकिटे असतात.

Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड' दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर
Paris Olympics : आधी लाखो कंडोम वाटले, नंतर झोपण्यासाठी 'अँटी सेक्स बेड' दिला; पॅरिसमध्ये खेळाडूंना संताप अनावर (Screengrab)

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या मेगा इव्हेंटमध्ये ३२ खेळांमध्ये ११,००० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. तसेच ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खूप छान वातावरण आहे. ऑलिम्पिकसाठी दिग्गज खेळाडू परिसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे एक विशेष किट देऊन स्वागत करण्यात आले.

पण या किटमध्ये काय होते? हे तु्म्हाला माहीत आहे का? वास्तविक, फोन आणि इतर आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, या किटमध्ये कंडोमचे पॅकेट असतात. पण आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले काही खेळाडू चांगलेच नाराज झाले आहेत.

ऑस्ट्रेलियन खेळाडू संतापले'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये अंदाजे २३०,००० कंडोम वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक खेळाडूला सुमारे २० कंडोमचे वाटप केले जाईल. पण खऱ्या गदारोळाचे कारण काही वेगळेच आहे. खरं तर, टोकियो ऑलिम्पिक २०२० प्रमाणे यावेळीही 'अँटी-सेक्स' कार्डबोर्ड बेड पॅरिसमधील खेळाडूंनाही देण्यात आले आहेत, हा वादाचा खरा मुद्दा आहे.

या अँटी-सेक्स बेडमुळे जगभरातील खेळाडू संतापले आहेत. विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी याविरोधात आवाज उठवला आहे. इन्स्टाग्रामवर अनेक रील व्हायरल होत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

झोप चांगली झाली नसेल तर…

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ॲथलीट म्हणत आहे की बेड बकवास आहे... ऑस्ट्रेलियन वॉटर पोलो खेळाडू टिली केर्न्सने व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये, ती सांगते की पॅरिस ऑलिम्पिकमधील तिच्या देशाच्या ऑलिंपियन्सना कठीण बेडवर झोपणे सोपे करण्यासाठी मॅट्रेस टॉपर्स मिळाले आहेत.

हा व्हिडिओ ३.६ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की जर खेळाडू शांतपणे झोपू शकत नाहीत तर ते चांगले प्रदर्शन कसे करू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या