मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा चीनकडून पराभव

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा चीनकडून पराभव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 19, 2023 10:31 PM IST

IND vs CHN: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला चीनकडून ५-१ असा पराभव स्वीकारावा लागलाय.

IND vs CHN
IND vs CHN

India vs China Football Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा चीनकडून पराभव स्वीकारावा लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चीनविरुद्ध एकच गोल करता आले. दरम्यान, २०१४ नंतर भारतीय फुटबॉल संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरात निराशा पडली. परंतु, पुढील सामन्यात भारतीय फुटबॉल संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि चीन यांच्यात हांगझू येथील हुआंगलाँग स्पोर्ट्स सेंटर स्टेडियममध्ये खेळण्यात आला. या सामन्यात सुरुवातीपासूनच चीनचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्याच्या १७व्या मिनिटाला चीनने पहिला गोल करून १-० अशी आघाडी घेतली. चीनकडून तियानीने पहिला गोल केला. यानंतर राहुल केपीने भारतासाठी पहिला गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

दुसऱ्या हाफमध्ये ५१व्या मिनिटाला चीनने दुसरा गोल केला. चीनसाठी दुसरा गोल दाई वेइजुनने केला. यानंतर चीनच्या संघाने भारताला पुनरागमनाची संधी दिली नाही. सामन्यातील ७२व्या मिनिटाला चीनने तिसरा गोल करत सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनंतर म्हणजेच सामन्याच्या ७५व्या मिनिटाला ताओ कियांगलाँगने आपला दुसरा आणि चीनसाठी चौथा गोल केला. फिफा क्रमवारीत ८०व्या क्रमांकावर असलेला चीनच्या फुटबॉल संघाने सामन्याच्या शेवटी पाचवा करत भारताचा ५-१ असा पराभव केला.

WhatsApp channel

विभाग