Asian Games Cricket: भारताचं क्रिकेटमध्ये पदक पक्क, बांग्लादेशला ९ विकेट्सनं हरवून फायनलमध्ये धडक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games Cricket: भारताचं क्रिकेटमध्ये पदक पक्क, बांग्लादेशला ९ विकेट्सनं हरवून फायनलमध्ये धडक

Asian Games Cricket: भारताचं क्रिकेटमध्ये पदक पक्क, बांग्लादेशला ९ विकेट्सनं हरवून फायनलमध्ये धडक

Updated Oct 06, 2023 10:12 AM IST

Asian Games Mens T20I 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने बांग्लादेशला ९ विकेट्सनं हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Team India
Team India

Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतानं बांगलादेशचा ९ विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं या स्पर्धेत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ९७ धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारताने अवघ्या १० षटकात पूर्ण केले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होईल.

आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. बांगलादेशनं त्यांचा पहिला विकेट अवघ्या १८ धावांवर गमावला. यानंतर बांगलादेशच्या संघानं ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. बांग्लादेशला २० षटकात ९ विकेट गमावून ९६ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद २४ धावांची खेळी केली. तर, परवेझ हुसेनने २३ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय रकीबुल हसनला दुहेरी आकडा गाठता आला. बांगलादेशचे ७ फलंदाजांना १० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.भारताकडून रवी साई किशोरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरच्या खात्यात दोन विकेट जमा झाल्या. अर्शदीप सिंह, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक- एक विकेट मिळाली.

बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या तिलक वर्माने ऋतुराज गायकवाडसह विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या ५० धावापर्यंत पोहोचवली. यानंतर ९.२ षटकातच भारताने हा सामना जिंकला. तिलक वर्माने २६ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली. तर, ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग