Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक, पावसामुळे फायनल रद्द
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक, पावसामुळे फायनल रद्द

Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक, पावसामुळे फायनल रद्द

Published Oct 07, 2023 02:49 PM IST

Asian Games IND vs AFG Final 2023 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ICC T20 क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

Asian Games 2023
Asian Games 2023

Asian Games IND vs AFG Final 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवारी (७ ऑक्टोबर) सामना रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ विकेट गमावत ११२ धावा केल्या होत्या. यानंतर सामना होऊ शकला नाही.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. भारताने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते तर २०१४ मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता, त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अफगाणिस्तानचा डाव 

अफगाणिस्तानकडून शाहिदुल्ला कमालने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. कर्णधार गुलबदिन नायब २७ धावा करून नाबाद राहिला. अफसर झझाईने १५ धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. जुबैद अकबरी ५ धावा करून बाद झाला तर मोहम्मद शहजाद ४ धावा करून बाद झाला. 

नूर अली झद्रान आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक धाव काढली. भारताकडून अर्शदीप सिंग, शिवम दुबे, शाहबाज नदीम आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत

यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग

अफगाणिस्तान

झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जद्रान, अफसर झझाई, शाहिदुल्ला कमाल, करीम जनात, गुलबदीन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, जहिर खान

Whats_app_banner

संबंधित बातम्या