Asian Games : भारताच्या रिले टीमची सुवर्ण कामगिरी, नीरज चोप्रानेही कमावलं सोनं, भारताच्या झोळीत ८१ पदकं
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games : भारताच्या रिले टीमची सुवर्ण कामगिरी, नीरज चोप्रानेही कमावलं सोनं, भारताच्या झोळीत ८१ पदकं

Asian Games : भारताच्या रिले टीमची सुवर्ण कामगिरी, नीरज चोप्रानेही कमावलं सोनं, भारताच्या झोळीत ८१ पदकं

Published Oct 04, 2023 06:23 PM IST

asian games 2023 : भारतीय पुरुष संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाने ३:०१.५८ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर कब्जा केला.

asian games 2023
asian games 2023

एशियन गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या ४x४०० रिले शर्यतीत भारताने मोठी कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाने ३:०१.५८ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर कब्जा केला. मुहम्मद अनस, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश या संघाने सुवर्णपदक जिंकले.

यानंतर आता भारताच्या खात्यात आतापर्यंत १८ सुवर्ण , ३१ रौप्य, ३२ कांस्य अशी एकूण ८१ पदके आहेत.

महिलांच्या रिले टीमला रौप्य पदक

भारतीय महिला संघाने ४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या सहा वेळपासून भारत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत होता. मात्र, यावेळी भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. विथ्या रामराज, ऐश्वर्या मिश्रा, प्राची, सुभा व्यंकटेशन या संघाने रौप्यपदक पटकावले आहे.

भालाफेकीत सुवर्ण आणि रौप्य भारताकडे

तत्पूर्वी, एशियन गेम्स 2023 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकले. तर भारताच्याच किशोर जेना याने रौप्य पदक कमावले आहे.

नीरज आणि किशोर दोघेही त्यांच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या प्रयत्नात फाऊल झाले. मात्र नीरजने सुवर्णपदक तर किशोरने रौप्यपदकावर कब्जा केला. नीरजचा सर्वोत्तम थ्रो 88.88 मीटर होता, तर किशोर जेनाचा ८७.५४ मीटर होता. याच जोरावर दोघांनी पदके जिंकली. भालाफेकीत भारताने एकाच वेळी ही दोन्ही पदके जिंकण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

भारताकडेआतापर्यंत किती पदके?

सुवर्ण : १८

रौप्य : ३१

कांस्य: ३२

एकूण: ८१

अविनाश साबळेला रौप्य

तत्पूर्वी, पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत भारताने मोठी कामगिरी केली. अविनाश साबळेने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. या शर्यतीत गुलवीर सिंग चौथ्या स्थानावर राहिला, त्याचे कांस्यपदक हुकले. यापूर्वी याच एशियन गेम्समध्ये अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या