हांगझोऊ : एशियन गेम्समध्ये भारत आणि इराण दरम्यान खेळल्या गेलेल्या पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. मुकाबला संपण्यासाठी केवळ ६५ सेंकद शिल्लक होते. सामना २८-२८ अंकांनी बरोबरीत होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार पवन सेहरावत डू एंड डाई रेड करत होता. कारण पवनला कोणत्याही परिस्थितीत पॉइंट घ्यायचा होता. तो इराणी डिफेंडरला टच करण्याच्या प्रयत्नात लॉबीमध्ये गेले. त्यानंतर मॅटवर उपस्थित ४ खेळाडूही लॉबीमध्ये आले.
भारतीय कबड्डी टीमचा दावा होता की, पवन सेहरावत कोणत्याही खेळाडूनला टच न करता लॉबीमध्ये गेल्याने तो आउट आहे. त्याचबरोबर इराणचे चार डिफेंडरही आउट आहेत. रेफरीने पहिल्यांदा दोन्ही संघांना १-१ पॉइंट दिला. भारताने यानंतर वाद घालायला सुरूवात केली. त्यानंतर रेफरीने भारताला तीन तर इराणला एक पॉइंट दिला. त्यानंतर इराणने विरोध केल्यानंतर रेफरीने खूप चर्चा व विचारविनिमय केल्यानंतर १-१ पाईंट दिला.
या वादानंतर टीम इंडियाचे कोच के भास्करन यांनी कबड्डी ऑफिशियल्सकडे तक्रार केली. खूप वेळ वाद झाल्यानंतर रेफरीने भारताला चार आणि इराणला एक पॉइंट दिला.
पुन्हा इराणने नाराजी व्यक्त करत या निर्णयाला विरोध केला. शेवटी भारताला तीन व इराणला एक पॉइंट दिला. नियम हाच होता त्यामुळे इराणला सहमती नोंदवावी लागली. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला.
भारताला तीन पॉइंट मिळाल्यानंतर स्कोर ३१-२९ झाला. पुढच्या रेडमध्ये भारतीय डिफेंडरने इराणच्या रेडरला आउट केले. पुढची रेड सामन्यातील अंतिम रेड होती. त्यात भारतीय रेडरने पॉइंट घेऊन सामना ३३-२९ वर आणला. त्यानंतर रेफरीने सामना संपल्याची घोषणा केली. या विजयाबरोबरच भारताने गोल्ड मेडल आपल्या नामावर केले. २०१८ मध्ये एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये भारताला इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने पुन्हा एकदा एशियन गेम्समधील कबड्डीचे विजेतेपद खेचून आणले आहे.