मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023 Schedule : एशियन गेम्सचं वेळापत्रक जाहीर, क्रिकेटचे सामने या दिवसापासून रंगणार, पाहा

Asian Games 2023 Schedule : एशियन गेम्सचं वेळापत्रक जाहीर, क्रिकेटचे सामने या दिवसापासून रंगणार, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 16, 2023 03:02 PM IST

asian games 2023 full schedule : १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबरपासून रंगणार आहेत.

asian games cricket schedule
asian games cricket schedule

asian games cricket schedule : एशियन गेम्स 2023 चे आयोजन चीनच्या हांगझोउ शहरात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वास्तविक, हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ती होऊ शकली नाही. हांगझोऊ व्यतिरिक्त इतर ५ शहरांमध्येही या स्पर्धेतील विविध इव्हेंट होणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा १६ दिवस चालणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबरपासून

वेळापत्रकानुसार आशियाई क्रीडा स्पर्धेतील बहुतांश सामने २३ सप्टेंबरपासून सुरू होतील. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही याच दिवशी होणार आहे. तर क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. त्याच वेळी, या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

एशियन गेम्स लाईव्ह कसे पाहणार?

भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आशियाई खेळांचे सामने पाहता येणार आहेत. वास्तविक, सोनी स्पोर्ट्स हे आशियाई खेळांचे अधिकृत प्रसारक आहे. याशिवाय चाहत्यांना सोनी लाइव्ह अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

एशियन गेम्स २०२३ चे वेळापत्रक-

उद्घाटन समारंभ - २३ सप्टेंबर

आर्टिस्टिक स्विमिंग- ६- ८ सप्टेंबर

डायव्हिंग- ३० सप्टेंबर- ४ ऑक्टोबर

मॅरेथॉन स्विमिंग- ६- ७ ऑक्टोबर

स्विमिंग २४- २९ सप्टेंबर

वॉटर पोलो- २५ सप्टेंबर- ७ ऑक्टोबर

धनुर्विद्या १- ७ ऑक्टोबर

अॅथलेटिक्स २८ सप्टेंबर- ५ ऑक्टोबर

 

बॅडमिंटन २८ सप्टेंबर- ७ ऑक्टोबर

बेसबॉल २६ सप्टेंबर- ७ ऑक्टोबर

सॉफ्टबॉल २६ सप्टेंबर- २ ऑक्टोबर

बास्केटबॉल 3X3 सप्टेंबर २५ - १ ऑक्टोबर

बास्केटबॉल २६ सप्टेंबर - ६ ऑक्टोबर

बॉक्सिंग २४ सप्टेंबर- ५ ऑक्टोबर

ब्रेकिंग ६ - ७ ऑक्टोबर

डोंगी / कयाक (स्लॅलम) ५ - ७ ऑक्टोबर

कॅनो / कयाक (स्प्रिंट) ३० सप्टेंबर- ३ ऑक्टोबर

क्रिकेट १९ - २५सप्टेंबर (महिला), २७ सप्टेंबर- ७ ऑक्टोबर (पुरुष)

 

सायकलिंग (BMX रेसिंग)- १ ऑक्टोबर

सायकलिंग (माउंटन बाईक-) २५ सप्टेंबर

सायकलिंग (रोड)- ३ - ५ ऑक्टोबर

सायकलिंग- (ट्रॅक) २६-२९ सप्टेंबर

ड्रॅगन बोट- ४-६ ऑक्टोबर

घोडेस्वारी- २६ सप्टेंबर- ६ ऑक्टोबर

तलवारबाजी- २४-२९ सप्टेंबर

फुटबॉल- १९ सप्टेंबर-७ ऑक्टोबर

गोल्फ 28 सप्टेंबर-1 ऑक्टोबर

 

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक- सप्टेंबर २४ - २९

रिदमॅटिक जिम्नॅस्टिक्स ६-७ ऑक्टोबर

ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स २-३ ऑक्टोबर

हँडबॉल- २४ सप्टेंबर- ५ ऑक्टोबर

हॉकी २४ सप्टेंबर - ७ ऑक्टोबर

जुडो २४ - २७सप्टेंबर

कबड्डी २-७ ऑक्टोबर

जू-जित्सू ऑक्टोबर ५-७

कराटे ५-८ ऑक्टोबर

कुराश ३० सप्टेंबर- २ ऑक्टोबर

ब्रिज २७ सप्टेंबर-६ ऑक्टोबर

 

चेस २४ सप्टेंबर - ७ ऑक्टोबर

ईस्पोर्ट्स २४ सप्टेंबर-२ ऑक्टोबर 

गो (Go) २४ सप्टेंबर - ३ ऑक्टोबर 

शियांगकी २८ सप्टेंबर-७ ऑक्टोबर

मॉडर्न पेंटॅथलॉन २० - २४ सप्टेंबर

रोलर स्केटिंग सप्टेंबर ३० - ७ ऑक्टोबर 

स्केटबोर्डिंग सप्टेंबर २४ - २७

रोइंग- सप्टेंबर २० - २५ 

रग्बी सेव्हन्स- २४-२६ सप्टेंबर

नौकानयन २१ -२७ सप्टेंबर

सेपकतकरॉ(Sepaktakraw) - २४ सप्टेंबर- ७ ऑक्टोबर

 

शूटिंग २४ सप्टेंबर-१ ऑक्टोबर

सॉफ्ट टेनिस ३-७ ऑक्टोबर

स्पोर्ट क्लाइंबिंग ३-७ ऑक्टोबर

स्क्वॅश २६ सप्टेंबर-५ ऑक्टोबर

टेबल टेनिस २२ सप्टेंबर-२ ऑक्टोबर

तायक्वांदो २४ - २८ सप्टेंबर

टेनिस २४ - ३०सप्टेंबर

ट्रायथलॉन २९  सप्टेंबर-२ ऑक्टोबर

बीच व्हॉलीबॉल १९ - २८ सप्टेंबर

व्हॉलीबॉल १९-२६ सप्टेंबर (पुरुष), २० सप्टेंबर-७ ऑक्टोबर (महिला)

वेटलिफ्टिंग ३० सप्टेंबर-७ ऑक्टोबर

कुस्ती ४-७ ऑक्टोबर

वुशू २४-२८ सप्टेंबर

समारोप समारंभ-  ८ ऑक्टोबर

WhatsApp channel