Asian Games 2023 Cricket : चीनमध्ये होणाऱ्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ सहभागी होत आहेत. चांगल्या रँकिंगमुळे दोन्ही संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दोन्ही संघांची घोषणा आधीच केली आहे.
एकदिवसीय विश्वचषकामुळे भारताचा बी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघाचे कर्णधारपद युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड सांभाळताना दिसणार आहे, तर महिला संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असेल.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर २ सामन्यांच्या बंदीमुळे टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तरच तिला खेळण्याची संधी मिळणार आहे. १९व्या एशियन गेम्समध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर पुरुष क्रिकेट स्पर्धा २८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अंतिम सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे.
१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे होणार असून त्यामधील सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या ग्राउंडवर खेळवले जातील.
आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व खेळांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग केले जाईल.
आशियाई खेळ 2023 साठी भारताचा पुरुष आणि महिला संघ येथे आहे
भारतीय पुरुष संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी मिनु गायकवाड, तितास साधू. , कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.
राखीव खेळाडू : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.