मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023 Ind vs Mal : टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, १५ षटकात ठोकल्या १७३ धावा

Asian Games 2023 Ind vs Mal : टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, १५ षटकात ठोकल्या १७३ धावा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2023 10:55 AM IST

India vs Malaysia womens cricket highlights : भारतीय महिला क्रिकेट संघाने २४ सप्टेंबर रोजी होणार्‍या एशियन गेम्स 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज (२१ सप्टेंबर) मलेशिया विरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या स्पर्धेत टीम इंडियाची रँकिंग अधिक असल्याने थेट सेमी फायनलचे तिकीट मिळाले.

India vs Malaysia womens cricket
India vs Malaysia womens cricket

India vs Malaysia womens cricket Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज (२१ सप्टेंबर) भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला, त्यामुळे सामना अनिर्णित राहिला आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

ट्रेंडिंग न्यूज

पावसाने व्यत्यय आणलेल्या या मलेशियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १५ षटकांत १७३ धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्मा (६७), जेमिमाह रॉड्रिग्स (४७), ऋचा घोष (२१) यानी तुफानी खेळी खेळली. पण यानंतर मलेशियाच्या डावाच्या दोन चेंडूंनंतर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. अखेर टीम इंडियाला उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळाली. 

तत्पूर्वी, भारत-मलेशिया सामन्यात नाणेफेकही उशीरा झाली. पण शेफाली, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांच्या खेळीमुळे भारताने १५ षटकात १७३ धावा केल्या. यानंतर धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा संघ मैदानात उतरला होता, मात्र, दोन चेंडूत १ धाव झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सामना होऊ शकला नाही.

टीम इंडियाला २ मॅच जिंकल्यावर मिळेल गोल्ड

वास्तविक, टीम इंडियाची रँकिंग चांगली होती, त्यामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचला. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना २४ सप्टेंबर रोजी बांगलादेश किंवा हाँगकाँग यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होईल. आता भारताला सुवर्णपदक जिंकण्यासाठी केवळ उपांत्य फेरी आणि त्यानंतर फायनल सामना जिंकावा लागणार आहे.

एशियन गेम्स 2023 स्पर्धेत क्रिकेट हे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळले जात आहे. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान महिला संघांचे सामने होणार आहेत. तर आशियाई खेळांतर्गत पुरुष संघांची T20 स्पर्धा २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाईल. महिलांप्रमाणेच भारतीय पुरुष संघही थेट उपांत्यपूर्व फेरीतील सामने खेळणार आहे.

 

WhatsApp channel