मराठी बातम्या  /  Sports  /  Asia Cup Shaheen Afridi Ruled Out Of The Tournament Big Blow To Pakistan Cricket Team Ahead Of Asia Cup 2022

Shaheen Afridi: पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर

Shaheen Afridi
Shaheen Afridi
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Aug 20, 2022 05:09 PM IST

Shaheen Afridi Ruled Out Asia Cup: आशिया चषक सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.

आशिया चषक सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. डॉक्टरांनी शाहिनला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे. आफ्रिदीच्या एक्झिटचा अर्थ म्हणजे दोन प्रमुख गोलंदाज आशिया कपमध्ये दिसणार नाहीत. त्याच्याआधी भारताचा जसप्रीत बुमराहही स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शाहीन आफ्रिदी आशिया चषक तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळणार नाही. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी तो पुनरागमन करू शकतो. गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आफ्रिदीला ही दुखापत झाली होती.

पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलँडमध्ये आहे. शाहीन आपले रिहॅबिलिटेशन पूर्ण करण्यासाठी संघासोबतच असणार आहे. आशिया चषकासाठी शाहीनच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पाकिस्तानचा संघ सोमवारी (२२ ऑगस्ट) रॉटरडॅमहून दुबईला पोहोचणार आहे.

दरम्यान,  दुखापत होऊनही आफ्रिदीची आशिया चषकासाठी निवड करण्यात आली होती. त्याचवेळी अनुभवी हसन अलीला बाहेर ठेवण्यात आले होते. आता हसन अली संघात पुनरागमन करेल असे मानले जात आहे.

 पहिला सामना भारताविरुद्ध 

२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना २८ ऑगस्टला दुबईत खेळवला जाईल. या दोन्ही संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात एकूण तीन संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त क्वालिफायर फेरी जिंकणारा संघ या गटात प्रवेश करेल. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद, उस्मान कादिर, फखर जमान, हरिस रौफ, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी.

 

WhatsApp channel