मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wasim Akram: स्टोक्स, रसेल की पांड्या? नंबर वन ऑलराऊंडर कोण आहे, जाणून घ्या

Wasim Akram: स्टोक्स, रसेल की पांड्या? नंबर वन ऑलराऊंडर कोण आहे, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 30, 2022 07:20 PM IST

हार्दिक पाांड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरला. त्यानंतर आता नंबर वन ऑलराऊंडर कोण? या चर्चांना उधाण आले आहे. कोणी भारताचा हार्दिक पंड्या, कुणी इंग्लंडचा बेन स्टोक्स तर कुणी वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल नंबर वन ऑलराऊंडर असल्याचे सांगत आहेत. या बाबतीत दिग्गज ऑलराऊंडर वसीम अक्रमनेही आपले मत मांडले आहे.

Wasim Akram
Wasim Akram

आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला तो अष्टपैलू हार्दिक पांड्या. आधी ३ विकेट घेतल्यानंतर त्याने मॅचविनिंग इनिंगही खेळली. हार्दिकने १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. यानंतर आता नंबर वन ऑलराऊंडर कोण? या चर्चांना उधाण आले आहे. कोणी भारताचा हार्दिक पंड्या, कुणी इंग्लंडचा बेन स्टोक्स तर कुणी वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल नंबर वन ऑलराऊंडर असल्याचे सांगत आहेत.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही या बाबतीत आपले मत मांडले आहे. अक्रमने हार्दिक पांड्याचे वर्णन जगातील महान अष्टपैलू खेळाडू म्हणून केले आहे. भारत - पाकिस्तान  सामन्यानंतर एका वाहिनीशी बोलताना अक्रम म्हणाला, “माझ्यासाठी हार्दिक सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो आंद्रे रसेल आणि इतर सर्वांपेक्षा चांगला आहे. हार्दिक फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकतो”.

तसेच, “हार्दिकला हे देखील माहित आहे की तो सध्याच्या घडीला जगातील महान अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची टॉप स्पीड १४० kmph पेक्षा जास्त आहे”.

सोबतच, “तो सामन्यातील परिस्थिती आणि शक्यतांनुसार आपला डाव पुढे नेतो. ही क्षमता त्याला भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनवते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही वसीम अक्रमच्या विधानाशी सहमती दर्शवली आहे. पठाण म्हणाला की, 'हार्दिक हा खऱ्या अर्थाने भारतासाठी एक्स-फॅक्टर आहे”. 

स्टोक्स विरुद्ध पांड्या

स्टोक्सने या वर्षात इंग्लंडकडून एकही टी-२० खेळलेला नाही. त्याच वेळी २०२० आणि २०२१ मध्ये त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. २०२० मध्ये स्टोक्सने ६ सामन्यात १२६ धावा केल्या होत्या. याशिवाय ६ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०२१ मध्ये स्टोक्सने ५ सामन्यात ८४ धावा केल्या होत्या आणि ३ विकेट घेतल्या होत्या. 

त्याचवेळी हार्दिकबद्दल सांगायचे तर या वर्षी त्याने भारतासाठी १४ टी-20 सामने खेळले असून १४४ च्या स्ट्राइक रेटने ३१४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ११ विकेट्सही घेतल्या आहेत.

 

WhatsApp channel