मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: शतक ठोकताच विराटनं बोलून दाखवली मनातली वेदना; म्हणाला…

Virat Kohli: शतक ठोकताच विराटनं बोलून दाखवली मनातली वेदना; म्हणाला…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 09, 2022 12:15 PM IST

Virat Kohli 71st Century: विराट-कोहलीच्या या शानदार शतकाच्या जोरावरच भारताने आफगाणिस्तानला १०१ धावांनी धुळ चारली. या विजयानंतर कोहलीने सांगितले की, “ब्रेकमुळे मला क्रिकेटबद्दल बरेच काही शिकता आले. जेव्हा तो ६०-७० धावा काढायचा तेव्हा लोक त्याला अपयश मानायचे. जे खूपच धक्कादायक होते”.

virat kohli
virat kohli

विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आता संपली आहे. कोहलीने आफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. कोहलीने ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक ठोकण्याची कोहलीची शैलीही शानदार होती. त्याने फरीद मलिकच्या गोलंदाजीवर डीप-मिडविकेटवर षटकार ठोकून शतक पूर्ण केले. दुबईत सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध हे शतक पूर्ण केले.

विराट-कोहलीच्या या शानदार शतकाच्या जोरावरच भारताने आफगाणिस्तानला १०१ धावांनी धुळ चारली. या विजयानंतर कोहलीने सांगितले की, “ब्रेकमुळे मला क्रिकेटबद्दल बरेच काही शिकता आले. जेव्हा तो ६०-७० धावा काढायचा तेव्हा लोक त्याला अपयश मानायचे. जे खूपच धक्कादायक होते”.

पत्नी अनुष्काचे कौतुक

“मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. नोव्हेंबर २०१९ नंतर आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. या फॉरमॅटमध्ये मला शतकाची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी संघात परतलो तेव्हा सर्वांनी माझे स्वागत केले. मी माझ्या गळ्यातील रिंगचे चुंबन घेतले. कारण अनुष्का शर्मा कठीण काळात माझ्या पाठीशी उभी राहिली. हे शतक तिचे आणि मुलगी वामिकाचे आहे".

माझ्या ६०-७० धावाही माझे अपयश मानले गेले

तसेच, कोहली पुढे म्हणाला. “मला जे काही मिळाले ते देवामुळेच आहे आणि हे मान्य करायला मला संकोच वाटत नाही. खरे सांगायचे तर, मी माझ्या सर्व शक्तीनिशी फलंदाजी केली आणि स्वत:ला चकित केले. माझ्या ६०-७० धावा देखील माझे अपयश मानले गेले जे खूपच धक्कादायक होते. मी खरोखर कोणाला काही सांगू शकत नाही कारण मी म्हणालो की देवाने मला भूतकाळात चांगल्या गोष्टी दिल्या आहेत”.

ब्रेकवर गेल्याने बऱ्याच गोष्टी समजल्या

सोबतच, “मी सहा महिने ब्रेक घेतला. खेळापासून दूर राहून मी खूप काही शिकलो. लोक माझ्या शतकाबद्दल बोलत होते. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो होतो. मला माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची होती. मला माझी लय सापडली आहे", असेही कोहली म्हणाला.

असा राहिला कोहलीचा वाईट काळ

७० वे शतक ते ७१ व्या शतकादरम्यान विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ७२ सामने खेळले. या कालावधीत कोहलीने २६ अर्धशतके झळकावली आणि आता हे पहिले शतक झाले आहे. या वाईट टप्प्यात विराट कोहली ९ वेळा शून्यावर बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके:

१०० सचिन तेंडुलकर (७८२ डाव)

७१ विराट कोहली (५२२ डाव)

७१ रिकी पाँटिंग (६६८ डाव)

६३ कुमार संगकारा (६६६ डाव)

६२ जॅक कॅलिस (६१७ डाव)

WhatsApp channel

संबंधित बातम्या