मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: हाथ तो छोडो यार…रोहितची पाकिस्तानी चाहत्यांमध्ये क्रेझ, पाहा मजेशीर प्रसंगाचा video

Rohit Sharma: हाथ तो छोडो यार…रोहितची पाकिस्तानी चाहत्यांमध्ये क्रेझ, पाहा मजेशीर प्रसंगाचा video

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 01:18 PM IST

टीम इंडियाला रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर रोहित शर्मा पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला. या प्रसंगी एक मजेशीर प्रसंग घडला, जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

आशिया चषक २०२२ UAE मध्ये खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना भारताने पाच गडी राखून जिंकला होता. तर दुसरा सामना पाकिस्ताननेही ५ गडी राखूनच जिंकला. ४ सप्टेंबर रोजी सुपर ४ मध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध हा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानी चाहत्यांना भेटला. पाकिस्तानी चाहत्यांनी रोहितसोबत सेल्फी काढला आणि त्याचा ऑटोग्राफही घेतला. दरम्यान, एका चाहत्याने रोहितशी हस्तांदोलन केले, मात्र तो त्याचा हात सोडण्यास तयार नव्हता.

रोहितही त्या चाहत्याला हसत म्हणाला, “हाथ तो छोडो यार”, त्यानंतर चाहत्याने हात सोडला. यूएईमध्ये भारत आणि पाकिस्तानचे बरेच लोक राहतात, त्यामुळे दोन्ही संघांना येथे नेहमीच मोठा पाठिंबा मिळतो.

विशेष म्हणजे, आता फायनल मॅचही टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होईल, अशी चाहत्यांना आशा आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना ११ सप्टेंबरला होणार आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत यांपैकी दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. तर दोन संघांचा प्रवास सुपर-४ मध्ये संपेल.

श्रीलंकेविरुद्ध आज जिंकावेल लागणार-

आशिया चषक २०२२ च्या सुपर-फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना आज (६ सप्टेंबर) श्रीलंकेशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिन्ही विभागात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

WhatsApp channel