मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arshdeep singh jersey: धक्कादायक! एकाच खेळाडूची जर्सी घालून तीन जण खेळले!

Arshdeep singh jersey: धक्कादायक! एकाच खेळाडूची जर्सी घालून तीन जण खेळले!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 02, 2022 03:07 PM IST

arshdeep singh jersey: सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या व्यवस्थापनावर चांगलाच संतापलेला दिसला. सामन्यादरम्यान रोहितचा संताप स्पष्ट दिसत होता. तसेच, रोहित या सामन्यात शुन्यावर बाद झाला. अशा परिस्थितीत त्याचा राग अधिकच वाढला.

arshadeep singh
arshadeep singh

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा ५ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात भारताचे ३ खेळाडू अर्शदीप सिंगची जर्सी घालून मैदानात उतरले होते. प्रथम सूर्यकुमार यादवने अर्शदीपची जर्सी घालून भारताच्या डावाची सुरुवात केली. यानंतर आवेश खानही अर्शदीपच्या जर्सीत दिसला.

ढिसाळ मॅनेजमेंटमुळे सर्व खेळाडूंचे सामान मैदानात उशिरा पोहोचले होते. याच कारणामुळे सामना ८ ऐवजी ११ वाजता सुरू झाला. तोपर्यंत देखील सर्व खेळाडूंचे सामानही आले नव्हते. अशा परिस्थितीत खेळाडूंना एकमेकांची जर्सी घालून खेळावे लागले.

सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या व्यवस्थापनावर चांगलाच संतापलेला दिसला. सामन्यादरम्यान रोहितचा संताप स्पष्ट दिसत होता. तसेच, रोहित या सामन्यात शुन्यावर बाद झाला. अशा परिस्थितीत त्याचा राग अधिकच वाढला.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने कमी धावसंख्या करूनही शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र अखेरच्या षटकात आवेश खानच्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला.

वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार रोहितने भुवनेश्वर कुमारऐवजी आवेश खानवर विश्वास दाखवला. आवेशने पहिला चेंडू नो बॉल टाकला. यानंतर पुढच्या चेंडू फ्री हिटवर फलंदाजाने षटकार मारला. त्यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून वेस्ट इंडिजने सामना जिंकला. या दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा सामना जिंकणारा संघ आघाडी घेईल. वेस्ट इंडिजने प्रदीर्घ कालावधीनंतर विजयाची चव चाखली आहे.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉयने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १७ धावा देत ६ बळी घेतले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. मॅकॉयने एकट्याने भारतीय फलंदाजीचा धुव्वा उडवला.

WhatsApp channel