मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022: दोन वर्षांची प्रतीक्षा संपली, आज अर्जुन तेंडुलकर खेळणार?

IPL 2022: दोन वर्षांची प्रतीक्षा संपली, आज अर्जुन तेंडुलकर खेळणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2022 12:37 PM IST

शनिवारच्या सामन्यात अर्जुनला निश्चित आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल, असे अर्जुनच्या पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना वाटत आहे.

महेला जयवर्धने आणि अर्जुन तेंडूलकर
महेला जयवर्धने आणि अर्जुन तेंडूलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन आज आयपीएलमधला (IPL) आपला पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. आज मुंबई इंडियन्सचा (MI) यंदाच्या मोसमातील शेवटचा सामना आहे, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (DC) या सामन्यात अर्जून खेळू शकतो. 

मुंबई इंडियन्साला या सीझनमध्ये १३ सामन्यात १० पराभव स्वीकारावे लागले आहेत, त्यामुळे त्यांचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मात्र, शनिवारी मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध या मोसमातला आपला शेवटचा सामना खेळायचा आहे आणि अर्जुन त्याच सामन्यातून पदार्पण करेल,  अशी पूर्ण शक्यता आहे. खुद्द मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने यापूर्वीच याबाबतचे संकेत दिले आहेत. “पुढच्या आयपीएल सीझनसाठी आम्हाला नवीन खेळाडूंची चाचपणी करायची आहे. यासाठी आम्ही काही नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी देऊ शकतो”. असे रोहित हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी म्हणाला होता.  रोहितच्या या क्तव्यावरून असे दिसते की, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. अर्जुन कधी एकदाचा मुंबई इंडियन्सकडून खेळेल, याची चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमात 20 लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच, या मोसमातही त्याच्यासोबत असेच घडले आहे. मात्र, शनिवारच्या सामन्यात अर्जुनला निश्चित आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल,  असे अर्जुनच्या पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना वाटत आहे.

मुंबईच्या विजातच बंगळूरुचा फायदा-

यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळूरुचे १४ सामन्यात १६ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १३ सामन्यात १४ गुण आहेत. बंगळुरु गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा विजय झाला तर त्यांचेही १६ गुण होतील पण नेट रनरेटच्या आधारावर दिल्ली चौथ्या स्थानावर झेप घेईल. असे झाले तर बंगळूरु पाचव्या स्थानावर घसरेल आणि स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे विराटच्या बंगळूरुला प्ले ऑफमध्ये पोहोचवण्यासाठी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आज जिंकावे लागणार आहे.

WhatsApp channel

विभाग