मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Anshu Malik: ऑलिम्पियन कुस्तीपटू अंशू मलिकचा बनावट अश्लील व्हिडिओ व्हायरल, एकास अटक

Anshu Malik: ऑलिम्पियन कुस्तीपटू अंशू मलिकचा बनावट अश्लील व्हिडिओ व्हायरल, एकास अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 19, 2023 07:28 PM IST

Anshu Malik Viral Video: ऑलिम्पियन कुस्तीपटू अंशू मलिकचा बनावट अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.

Anshu Malik
Anshu Malik

Anshu Malik Fake Video: हरियाणाचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंशू मलिकनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमागचं सत्य सांगितलंय. या व्हायरल व्हिडिओशी आपला कोणताही संबंध नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय. मात्र, तरीही तिच्यावर घाणेरड्या कमेंट केल्या जात आहे. यामुळं अंशू आणि तिच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तिनं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर काही तासांपूर्वी एका जोडप्यांचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अंशू मलिक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर नेटकऱ्यांनी अंशू मलिकला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र, हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा अंशूनं केला आहे. व्हायरल झालेल्या एमएमएसमधील फोटोंशी छेडछाड करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे अंशूनं म्हटलं आहे.

अंशू मलिकनं काय म्हटलंय?

"या व्हिडिओबाबत मला १६ सप्टेंबर २०२३ रोजी माहिती मिळाली. यानंतर तिच्या कुटुबियांनी त्वरीत पोलिसांत तक्रार दाखल दिली. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय, या व्हायरल व्हिडिओतील जोडप्यालाही पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय. मी आयुष्यात कधीच या दोघांना पाहिलं नाही. महत्त्वाचे म्हणजे, समाजातील लोक काहीही विचार न करता माझ्याबद्दल खाणेरड्या कमेंट करत आहेत", अशा शब्दात अंशू मलिकनं आपलं दुख व्यक्त केलं.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे अंशूला आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेता आला नाही. अंशू मलिक सध्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचारासाठी चेन्नईत आहे. अंशूनं २०२१च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

WhatsApp channel

विभाग