मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Anchita Sheuli: हमाली करून छोट्या भावाला वेटलिफ्टर बनवलं; कष्टाचं 'सोनं' झालं!

Anchita Sheuli: हमाली करून छोट्या भावाला वेटलिफ्टर बनवलं; कष्टाचं 'सोनं' झालं!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 08, 2022 02:45 PM IST

Achinta Sheuli: पश्चिम बंगालचा वेटलिफ्टर अचिंता शेऊलीने बर्मिंगहॅममध्ये शानदार कामगिरी केली. त्याने ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले. पण अचिंता शेऊलीसाठी वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करणे सोपे नव्हते. त्याच्या सोनेरी यशामागे त्याचा मोठा भाऊ आलोकचा खूप मोठा त्याग आहे.

Anchita Sheuli
Anchita Sheuli

Commonwealth Games 2022: भारताचा वेटलिफ्टर अचिंता शिऊलीने बर्मिंगहॅममध्ये शानदार कामगिरी केली. त्याने ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले. अंचिताने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये मिळून ३१३ किलो वजन उचलले.

कोलकात्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या देउलपूर येथून अचिंताने आपला प्रवास सुरू केला. पण २० वर्षीय अचिंता शेऊलीला वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करणे सोपे नव्हते.

अंचिता शेउलीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. अचिंता १० वर्षांचा असताना एके दिवशी पतंगाच्या मागे धावत धावत तो गावातील लोकल जिममध्ये पोहोचला. तिथे त्याचा मोठा भाऊ आलोक वेट लिफ्टिंगचा सराव करायचा. ते पाहून अंचितालाही वेटलिफ्टिंगबाबत आकर्षण निर्माण झाले आणि त्याचा कल वेटलिफ्टिंगकडे वळला. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. वडील जगत सायकल रिक्षा चालवायचे आणि कुटुंबाच्या गरजा भागवता याव्यात म्हणून हमालीचे कामही करायचे.

अंचिता ११ वर्षांचा असताना वडिलांचे निधन

मात्र, आलोक नॅशनलची तयारी करत असताना २०१३ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळेस अंचिता हा ११ वर्षांचा होता. वडिलांच्या आकस्मिक निधनाने अंचिताच्या कुटुंबासमोर आणखी मोठे संकट उभे राहिले. त्यामुळे आलोकला कॉलेजही सोडावे लागले. वडिलांच्या निधनानंतर आलोक हा कुटुंबातील एकमेव कमावणारा होता.

अंचितासाठी मोठा भाऊ आलोकचा मोठा त्याग

वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ आलोक याचे वेटलिफ्टर होण्याचे स्वप्न भंगले. मात्र, त्याने अंचिताला वेटलिफ्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्याने मिळेल ती कामे करायला सुरुवात केली. आलोकने सिलेंडर उचलण्यापासून ते हमाली करणे अशी विविध कामे केली आहेत. तसेच, मुलांना दोन घास भरवता यावे म्हणून आईने शिवणकाम आणि विणकाम सुरू केले.

आलोकच्या तुटपुंज्या कमाईतून जे काही पैसे वाचायचे त्यातूनच अंचिताचा डाएट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो. तसेच, खूपच कमी संसाधनांसह अंचिता सराव करायचा. असे आलोक सांगतो.

दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर आणि घरच्या परिस्थितीमुळे अंचिताही तुटला होता. त्याने खेळापासून दूर राहायचे ठरवले होते. पण जिल्हा स्तर, कनिष्ठ स्तर आणि राष्ट्रीय स्तरावरील अंचिताच्या कामगिरीने त्याला वेळोवेळी पुढे जाण्याची प्रेरणा दिली.


WhatsApp channel