Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या-aman sehrawat reduce 4 6 kg weight in 10 hours before bronze medal match wrestling in paris olympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या

Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या

Aug 10, 2024 12:50 PM IST

अमन सेहरावतने कांस्यपदकाच्या लढतीपूर्वी खूप मेहनत घेतली होती. त्याने सुमारे १० तासात ४.६ किलो वजन कमी केले.

Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या
Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने कांस्यपदक जिंकले. या पदकासाठी त्याने खूप मेहनत घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार, अमनने १० तासांत ४.६ किलो वजन कमी केले. त्याचे वजन वाढले होते. पण एका रात्रीत मेहनत करून त्याने वजन कमी केले.

पण विनेश फोगटच्या बाबतीत हे होऊ शकले नाही. विनेशचे वजन १०० ग्रॅमने वाढले होते. यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले.

अमनने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. एएनआयशी बोलताना कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र दहिया म्हणाले, "संध्याकाळी कुस्ती संपली तेव्हा अमनचे वजन ४.५ किलो जास्त होते. त्याचे वजन ६१.५ किलो होते. उपांत्य फेरीचा सामना संपताच त्याला दीड तासाचे सेशन दिले. यानंतर आम्ही ऑलिम्पिक व्हिलेजला गेलो. यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आम्ही त्याला जिममध्ये घेऊन गेलो. तेथे एक तासानंतर ट्रेड मिल देण्यात आला. सोनाबाथही दिले'.

९०० ग्रॅम जास्त वजन दिसल्यानंतर पुन्हा कठोर परिश्रम केले

ट्रेनिंगदरम्यान अमनला गरम पाणी, लिंबू आणि मध देण्यात आले. मात्र रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा वजन तपासले असता ते ९०० ग्रॅम अधिक आढळले. यानंतर प्रशिक्षक दहिया यांनी पुन्हा प्रशिक्षण सुरू केले. अमन ट्रेडमिलवर धावू लागला. यानंतर सोनाबाथ घेतले.

विनेश १०० ग्रॅम वजन कमी करू शकली नाही

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेशने चमकदार कामगिरी केली होती. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचे वजन १०० ग्रॅमने जास्त राहिले. वजन कमी करण्यासाठी विनेशने रात्रभर मेहनत घेतली. यासोबतच डोक्यावरच केसही कापले. तिने कपडेही लहान केले. मात्र त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. विनेशचे १०० ग्रॅम वजन तिच्यासाठी जड झाले.

विनेशने रौप्य पदकासाठी अपील केले

विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर चाहते खूप दुःखी होते. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर झाल्या. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही विनेशच्या बाजूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मात्र, विनेशने CAS मध्ये अपील दाखल केले आहे. त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. विनेशच्या वतीने अपिलात तिने कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नसल्याचे म्हटले आहे.