मराठी बातम्या  /  क्रीडा  /  अजिंक्य रहाणेनं खरेदी केली अलिशान कार, किंमत ऐकून थक्क व्हाल...

अजिंक्य रहाणेनं खरेदी केली अलिशान कार, किंमत ऐकून थक्क व्हाल...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2022 02:25 PM IST

गेल्या वर्षीच पृथ्वी शॉने देखिलBMW630i Mस्पोर्ट्स कार खरेदी केली होती.

अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे (सोशल मीडिया)

टीम इंडियाचा कसोटीपटू अजिंक्य रहाणेने अलिशान अशी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. अजिंक्यने बीएमडब्ल्यू कारचे सीरिज 6 मॉडेल खरेदी केले आहे. त्याने 630i M Sport व्हेरियंट विकत घेतला आहे. रहाणेची ही स्पोर्ट कार पांढऱ्या रंगाची असून तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. तो गेल्या वर्षीच लाँच झाला होता. 

 टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखीन एका कारची भर पडली आहे. आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर पडताच ही गाडी अजिंक्य रहाणेपर्यंत पोहोचली आहे. 

रहाणे आयपीएलच्या या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. त्याचा संघ आता प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. या मोसमात रहाणेची कामगिरीही विशेष नव्हती. यामुळेच काही सामन्यांमध्ये त्याला बाहेरही बसावे लागले होते. 

दरम्यान, रहाणेकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे ऑडी Q5 देखील आहे, ज्यामध्ये तो अनेकदा दिसला आहे. अनेक भारतीय खेळाडूंकडे बीएमडब्ल्यूची सीरीज 6 कार आहे. गेल्या वर्षीच पृथ्वी शॉने देखिल BMW 630i M स्पोर्ट्स कार खरेदी केली होती.

 

आयपीएल २०२२ मध्ये रहाणेची कामगिरी-

यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यापूर्वी आयपीएल २०२१ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. या मोसमात रहाणेने केकेआरसाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. मात्र,  या मोसमात खास कामगिरी करु शकला नाही. तो दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला. यंदाच्या मोसमात रहाणेने ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९.०० च्या सरासरीने आणि १०३.९० च्या स्ट्राईक रेटने १३३ धावा केल्या आहेत. या १५ व्या मोसमातील त्याची सर्वोच्च धावसंख्या ४४ राहिली आहे. या मोसमात त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत.

WhatsApp channel

विभाग