मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs MI : पावसामुळे मुंबई-गुजरात क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या
GT vs MI Qualifier 2 Weather Udpdate
GT vs MI Qualifier 2 Weather Udpdate

GT vs MI : पावसामुळे मुंबई-गुजरात क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या

26 May 2023, 16:04 ISTRohit Bibhishan Jetnavare

GT vs MI Qualifier 2 Weather Udpdate : आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल. तर पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. गुजरात आणि मुंबई या मोसमात दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनीही प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे.

Ahmedabad Weather Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या क्वालिफायर-2 मध्ये आज (२६ मे) गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) सामना पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्सशी (MI) होणार आहे. गुजरात टायटन्सला क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे रोहित ब्रिगेडने एलिमिनेट सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी विजय मिळवला. उभय संघांमधील हा ब्लॉकबस्टर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल. तर पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. गुजरात आणि मुंबई या मोसमात दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनीही प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे.

पाऊस पडला तर काय? विजेता कसा ठरवला जाईल?

सामन्यादरम्यान (gt vs mi Ahmedabad Weather Update) हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे, परंतु क्वालिफायर 2 साठी राखीव दिवस नसल्यामुळे पाऊस पडला तर काय? विजेता कसा ठरवला जाईल? फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कसा ठरवला जाईल? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. याचे उत्तर येथे जाणून घेणार आहोत.

क्वालिफायर-2 पावसामुळे सुरू झाला नाही किंवा अनिर्णित राहिला, तर गुजरात टायटन्सला विजेता म्हणून घोषित केले जाईल कारण हा संघ पॉइंट टेबलवर मुंबई इंडियन्सपेक्षा पुढे आहे. मुंबई इंडियन्स १६ गुण आणि -०.०४४ नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स +.८०९ आणि २० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मात्र, पावसाची शक्यता नगण्य असल्याने या समीकरणाची गरज भासणार नाही.